Elon Musk on Twitter Ban Account : नियमांच्या उल्लंघन केल्यांमुळे तर कधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ट्विटरने अनेक अकाऊंटवर बंदी घातली आहे. ट्विटरने बॅन केलेल्या अकाऊंटमध्ये ( Ban Twitter Account ) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या नावाचाही समावेश आहे. एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्या हाती ट्विटरचा कारभार आल्यानंतर आधीच बॅन करण्यात आलेल्या ट्विटर अकाऊंटवरील बंदी हटणार की नाही, याबाबत अेक प्रश्न उपस्थित होत होते. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा इशारा दिला आहे. बंदी हटवण्यासाठी किती वेळ लागू शकतो यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली आहे. ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात, असं मस्क यांनी सांगितलं आहे. त्यांनी अस्पष्टपणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्याबाबतही इशारा दिला आहे.


ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु?


2020 साली, अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर, ट्रम्प समर्थक जमावानी कॅपिटल हिलवर हल्ला केला. या हिंसाचाराच्या या घटनेनंतर ट्विटरने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर तात्काळ बंदी घातली. ट्विटरच्या या कारवाईनंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल ( Truth Social ) नावाने स्वतःचा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला. आता एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा केव्हा सुरु होणार याकडे लोकांचे लक्ष लागलं आहे. 


ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी दरमहा 661 रुपयांचं शुल्क


एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात येताच मोठे बदल केले आहेत. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लू टिक असणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ब्लू टिकसाठी प्रतिमहिना 8 डॉलर म्हणजेच 661 रुपये इतकं शुल्क आकारण्यात येईल. सध्या असणारी ब्लू टिक सिस्टिम दर्जाहीन असल्याचं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. 


 युजर्सना आता 'ट्वीट एडिट'चा पर्याय


ट्विटरने ( Twitter ) आता 'एडिट ट्विट' फिचर ( Edit Tweet Button ) लाँच केलं आहे. ट्विटर एडिट बटणाचा ( Tweer Edit Feature ) पर्याय सध्या फक्त ठराविक युजर्सना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्विटरच्या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुम्ही ट्वीट केलेलं ट्वीट एडिट ( Edit ) म्हणजे दुरुस्त करता येणार आहे. नवीन फीचरमध्ये तुम्हाला ट्वीटच्या शेजारी असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला एडिट ट्वीट असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्विट एडिट करता येईल. भारतीय व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे.