Donald Trump Twitter Ban : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा दिलासा दिला आहे. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवरील बंदी मागे घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर 6 जानेवारी रोजी अमेरिकेत भडकलेल्या हिंसेसाठी ट्रम्प दोषी असल्याचं मानण्यात आलं. त्यानंतर हिंसाचार भडकवल्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर 88 मिलियन फॉलोअर्स होते. 


अलिकडे टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी खरेदी केली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. फाइनँशियल टाइम्स फ्यूचर ऑफ द कार या परिषदेत मस्क यांनी याबाबत घोषणा केली आहे. मस्क यांमी सांगितलं आहे की ते ट्रम्प यांच्या ट्विटरवरील मागे घेणार आहेत.






 






मस्क यांच्या घोषणेनंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस
एलॉन मस्क यांच्या या मोठ्या घोषणेनंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे. युजर्सकडून भन्नाट मीम्स व्हायरल करण्यात येत आहे. काही युजर्सने ट्रम्प यांच्या स्वागत करण्यासाठी मीम्स तयार केले आहेत.


व्हायरल होत असलेले मीम्स तुम्हीही पाहा






 






 






 






 






 






महत्त्वाच्या इतर बातम्या