एक्स्प्लोर

अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? मतदानाकडे जगाचं लक्ष

मुंबई: संपूर्ण जगाची नजर लागून असलेल्या अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवड करण्यासाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन, तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प मैदानात आहेत. मतदानाला भारतीयवेळेनुसार 10.30 वाजता सुरुवात झाली. हिलरी क्लिंटन या न्यूयॉर्कच्या शपाकुआमध्ये, तर डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क सिटीमध्ये मतदान करतील. मतदान पार पडल्यानंतर रात्रीपासून मतमोजणी होऊन निकाल यायला सुरुवात होईल, उद्या म्हणजेच बुधवारी सकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. ओबामांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांना समर्थन दिले आहे. त्यांनी स्वत: निवडणुक प्रचारात उतरुन अमेरिकन जनतेला डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांनाच मतदान करण्याचे आवाहन अमेरिकन जनतेला केले होते. त्यांनी आपल्या भाषणात अमेरिकन जनतेकडे महिला राष्ट्राध्यक्ष निवडीची संधी असून ती दौडू नये असे सांगितले आहे. अमेरिकेत वसलेल्या भारतीय वंशाचे हॉटेल उद्योजक संत सिंह चटवाला यांनीही हिलरी क्लिंटन यांना समर्थन दिले असून, या निवडणुकीत हिलरींचा विजय भारतासाठी फायद्याचे असल्याचे सांगितले आहे. विविध सर्वेमध्ये हिलरी क्लिंटन यांची आघाडी दरम्यान, अमेरिकेतील सर्वच सर्वेक्षणांनी हिलरी क्लिंटन यांच्याच बाजूने कौल दिला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने हिलरी क्लिंटन 45.3 % तर डोनाल्ड ट्रम्प 43% टक्के राष्ट्राध्यक्ष बनतील असे सांगितले आहे. तर रियर क्लियर पॉलिटिक्सच्या सर्वेनुसार, हिलरी क्लिंटन या 46.3% तर ट्रम्प हे 44.4% राष्ट्राध्यक्ष होतील असे सांगितले. एबीसी बॉशिंग्टन पोस्टनेही हिलरी क्लिंटन यांच्याच बाजूने कौल दिला आहे. तर रॉयटर्स-इप्सस यांनीही हिलरी क्लिंटनच राष्ट्राध्यक्ष होणार असे सांगितले आहे. 30 कोटी नागरिक करणार मतदान या निवडणुकीत एकूण 30 कोटी मतदार मतदान करणार असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात भारतीयांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुक्त कंठाने स्तूती करत निवडून आलो तर मोदींसारखे काम करेन असे सांगितले. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांनी मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेला ‘अबकी बार’च्या नाऱ्याचा वापर करत 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा दिला. निवडणुकीचे निकाल बुधवारी सकाळपर्यंत हाती येणार असून, निवडून येणारा उमेदवार 20 जानेवारी 2017 रोजी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारेल. भारतातही परिणाम दरम्यान, या निवडणुकीचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी होम-हवन सुरु केला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात हिलरी क्लिंटन यांच्या विजयासाठी पूजा केली जात आहे. संबंधित बातम्या डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं

महत्त्वाच्या बातम्या

लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Embed widget