सध्या इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणाऱ्या ओमायक्रॉनचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत आहेत. इंग्लडमध्ये ओमायक्रॉनचा विस्फोट झाला आहे. गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये 17 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे सगळ्या जगाला धडकी भरलीय. इंग्लडमध्ये ही स्थिती नेमकी का निर्माण झाली? इंग्लडमधील सध्याची परिस्थिती नेमकी काय? याबाबत इंग्लडमधून माहिती देतायेत हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी..



1) इंग्लडध्ये सध्याची स्थिती नेमकी काय?


सध्या इंग्लंडध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. इंग्लंडमध्ये गेल्या 24 तासात 1 लाख 22 हजार 186 रुग्ण नोंदवले गेले आहेत. यातील 30 रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. एका दिवसात ओमायक्रॉनचे 35 हजार 404 रुग्ण आढळले आहेत. सध्या इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचे 1 लाख 14 हजार 625 रुग्ण आहेत. मात्र, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. शशिकांत अहंकारी यांनी सांगितले. 2 हजारांच्या पुढे दररोज लोक रुग्णालयात जात आहेत. वाढत्या रुग्णांमुळे इंग्लडमध्ये निर्बंध लागू केलेत. मात्र, निर्बंधांना विरोध होताना दिसतोय. बाहेर पडण्यासाठी इथे लस घेतली नसेल तर रिपोर्ट निगेटीव्ह आला पाहिजे. तसेच मास्क बंधनकारक आहे. नियम मोडले तर कारवाई होते. 27 डिसेंबरपासून या ठिकाणी मोठा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. 


2)  लसीकरण या ओमायक्रॉनवर कितपत प्रभावी आहे.


लस घेतल्यावर कोरोना होणार नाही असे म्हणता येमार नाही. पण लस घेतल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण नक्कीच कमी जाले आहे. लस घेतल्यामुळे बाकीचे धोके आपण कमी करु शकतो. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. संरक्षण होण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे.  



3) दोन डोस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घ्यावा का? तुमचं मत काय


लसीकरणानंतरही संशोधन सुरूच आहे. दोन्ही डोस घेऊन जर तुम्हाला 180 दिवस झावे अलतील तर तुम्ही तिसरा डोस घेऊ शकता. कारण, लसीकरणामुळे 180 दिवस अॅन्टीबॉडीज सक्रीय राहतात. त्यानंतर कमी होतात. त्यामुळे सहा महिन्यानंतर तिसरा डोस घेतला पाहिजे. 80 टक्के लोकांनी बुस्टर डोस द्यायची इथे प्रकिया सुरू असल्याचे डॉ. अहंकारी यांनी सांगितले. लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.



4) इंग्लंडमध्ये सध्या डेल्मीक्रॉन हा शब्द वापरला जातोय. हा कोणता नवीन व्हेरियंटचा प्रकार आहे का?


ओमायक्रॉन आणि डेल्टा दोन्हीचा मिळून असा कोणताही नवीन व्हेरिएंट तयार झाला नाही. डेल्टा कमी  झाल्यानंतर आता ओमायक्रॉनचे प्रमाण वाढत आहेत. ही इटालीक नावे आहेत. असा कोणताही नवीन प्रकार नाही. मात्र, ओमायक्रॉन वेग खूप आहे. इंग्लंडमधील बंधने कमी केली होती. मार्केट खुले केले होते. त्यामुळे तिथे रुग्ण वाढत आहेत. 3 रा डोस सुरू केला आहे. आत्तापर्यंत 33 लाख नागरिकांना कोरोनाचा तिसरा डोस दिला आहे. 


5) ओमायक्रॉनची नवी काय लक्षणे आहेत?
जसे जसे व्हेरिएंट बदलतात तशी तशी लक्षणे बदलत गेली आहेत. आताच्या व्हेरिएंटमध्ये ह्दयाचा वेग वाढतो. तसेच अशक्तपणा खूप येतो. ही प्रमुख लक्षणे यामध्ये आढळलेली आहेत.


6) ओमायक्रॉन शरीरावर कितपत आघात करतो?
ओमायक्राॉनचा हा नवा व्हेरियंट येऊन 1 महिनाच झाला आहे. याचा शरीरावर कितपत आघात होतो हे समजायला आणखी 1 ते 2 महिने लागतील. त्यानंतर त्याचे विश्लेषण करता येील असे डॉ. अहंकारी यांनी सांगितले.


7) ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी इतर मार्ग कोणते आहेत?
ओमायक्रॉन हा कोविडचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि लसीकरण करणे याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. तसेच गर्दी न करणे गरजेचे आहे.  


8) ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यामगची कारणे काय आहेत? 
यावर्षी स्कॉटलंमध्ये COP26 परिषद झाली होती. यावेळी देश विदेशातून अनेकजण आले होते. याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याचा परिणाम तिथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले होते. तसेच इंग्लंडमध्ये सगळ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. येथील शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे डॉ. अहंकारी म्हणाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान मुलेच ओमायक्रॉनने बाधित झाल्याची आढळत आहेत. कारण ते सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करु शकत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. अहंकारी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: