एक्स्प्लोर
संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच महामानवाची जयंती साजरी होणार!

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आज म्हणजे एक दिवस आधी बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहे. या जयंतीनिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली होती. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाउंडेशन फॉर ह्यूमन होराइजनच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचं वर्ष असल्यामुळे या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने असमानता दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर परिसंवादही होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं. आंबेडकरांनी आयुष्यभर दलित आणि वंचितांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















