Usha Vance : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. या निवडणुकीत अमेरिकेच्या जनतेने रिपब्लीकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना भरभरून मतं दिली आहेत. या निवडणुकीत ट्रम्प (Donald Trump) यांचा विजय झाला असून ते आता अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांच्याच पक्षाचे जे. डी. व्हान्स हे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, व्हान्स हे अमेरिकेचे नवे उपराष्ट्राध्यक्ष ठरणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता उषा व्हान्स (Usha Vance) हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. कारण उषा व्हान्स आणि भारताचा संबंध काय आहे? लवकरच अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उषा व्हान्स आणि भारताचं नातं काय आहे? असं विचारलं जातंय.
जे. डी. व्हान्स यांच्यामुळे उषा व्हान्स हे नाव चर्चेत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. या विजयानंतर ट्रम्प यांचे साथीदार तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते जे डी व्हान्स (J D Vance) यांची जगभरात चर्चा होत आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे व्हान्स यांच्यावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. जे. डी व्हान्स यांच्यामुळेच आता उषा व्हान्स हे नावदेखील चर्चेत आले आहे. जे. डी. व्हान्स आणि उषा व्हान्स हे पती-पत्नी आहेत. म्हणजेच उषा व्हान्स या अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणून ओळखल्या जाणार आहेत. कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे.
उषा यांचं भारताशी खास नातं
त्या भारतीय वंशाचा अमेरिकन नागिरक आहेत. त्यांची आई ही मूळची भारतीय आहे. त्याच पद्धतीने उषा व्हान्स यादेखील भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक आहेत. त्यांची आईदेखील मूळची भारताची आहे. भारतीय वंशाचा उषा व्हान्स या अमेरिकेत वकिली करतात. त्यांचे पूर्ण नाव उा चिलकुरी व्हान्स असे आहे. 80 च्या दशकात त्यांचा परिवार भारताच्या आंध्र प्रदेशमधून कॅलिफोर्नियातल सॅन डियागो शहरात वास्तव्यास गेला. उषा यांचा जन्म कैलिफोर्नियातच झालेला आहे. त्यांचे वडील मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. तर त्यांच्या आई एक बायोलॉजिस्ट आहेत.
उषा अमेरिकेत करतात वकिली
उषा यांनी अमेरिकेतील माउंट कार्मेल हाय स्कूल येथून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर 2007 साली त्यांनी येल विद्यापीठातून इतिहास या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी येल विद्यापीठातूनच वकिलीचे शिक्षण घेतले. 2013 साली त्यांनी येल लॉ स्कूल येथून वकिलीत डॉक्टरेट केली.
जे. डी. व्हान्स आणि उषा व्हान्स यांची भेट कशी झाली?
जे. डी. व्हान्स आणि उषा व्हान्स यांची भेट ही लॉ कॉलेजमध्येच झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 2014 साली लग्न केले. उषा आणि जे.डी. व्हान्स यांना एकूण तीन आपत्य आहेत.
हेही वाचा :