Narendra Modi and Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्विवाद विजय मिळवला. दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. 2020 च्या निवडणुकीत ते जो बिडेन यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले होते. 132 वर्षांपूर्वी, ग्रोव्हर क्लीव्हलँड दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा विक्रम केला आहे.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मोदींचा ट्रम्प यांना फोन
अमेरिकेच्या निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना फोन केला आहे. ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे मोदी पहिले नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील निवडणुकीत निर्णायक विजय आणि काँग्रेस निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांततेसाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, संपूर्ण जग पंतप्रधान मोदींवर प्रेम करते. त्यांनी असेही जोडले की भारत एक महान देश आहे आणि पंतप्रधान मोदी एक महान व्यक्ती आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, ते त्यांना आणि भारताला खरा मित्र मानतात. विजयानंतर पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासोबत संवाद साधणारे पहिले जागतिक नेते असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेच्या निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अध्यक्ष ट्रम्प यांना फोन
ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे मोदी ठरले पहिले नेते
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील निवडणुकीत निर्णायक विजय आणि काँग्रेस निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी जागतिक शांततेसाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की संपूर्ण जग पंतप्रधान मोदींवर प्रेम करते. त्यांनी असेही जोडले की भारत एक महान देश आहे आणि पंतप्रधान मोदी एक महान व्यक्ती आहेत.
अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की ते त्यांना आणि भारताला खरा मित्र मानतात. विजयानंतर पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासोबत संवाद साधणारे पहिले जागतिक नेते असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
(सूत्रांच्या हवाल्याने)
इतर महत्त्वाच्या बातम्या