Donald Trump Narendra Modi नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प 2016 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फोन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले नेते ठरले. सूत्रांच्या माहितीनूसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील निवडणुकीत निर्णायक विजय आणि काँग्रेस निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काय बोलणं झालं?
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक शांततेसाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, संपूर्ण जग नरेंद्र मोदींवर प्रेम करते. भारत एक महान देश आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की ते त्यांना आणि भारताला खरा मित्र मानतात. विजयानंतर नरेंद्र मोदी हे त्यांच्यासोबत संवाद साधणारे पहिले जागतिक नेते असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प कसे जिंकले ?
अवैध घुसखोरीविरोधात ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली.
रशिया-युक्रेन, हमास-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाई बेरोजगारी वाढली होती.
अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, अशा धोरणांचा ट्रम्प यांच्याकडून पुरस्कार.
अमेरिकन उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना ट्रम्प यांचा पाठिंबा.
कमला हॅरिस यांचं सरकार आलं तर अवैध घुसखोरी वाढेल हा प्रचार करण्यात ट्रंप यशस्वी.
बांगलादेशातील हिंदू, अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारविरोधात ट्रम्प यांनी स्पष्ट भूमिका घेतली , त्यामुळे अमेरिकेतील हिंदू मते मिळवण्यात ट्रम्प यांना यश.
X चे मालक आणि उद्योजक एलन मस्क यांनी ट्रम्प यांना उघड पाठिंबा दिला.
ट्रम्प यांच्यासाठी मस्क यांनी प्रोफेशनल यंत्रणा कामाला लावली होती.
सुरुवातीला हवा कमला यांची तर प्रचारयंत्रणेचे उत्तम व्यवस्थापन ट्रम्प यांनी केलं.
बायडन यांची प्रतिमा वयोवृद्ध आणि अकार्यक्षम अशी झाली होती.
बायडन प्रशासनकाळात अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतला.
ट्रम्प यांचे सरकार आले तर युद्ध संपुष्टात येईल असं लोकांना वाटतं.
ट्रम्प यांनी मुख्याप्रवाहातील माध्यमांपेक्षा सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला.
कमला हॅरिस यांची प्रतिमा रंगवण्यात आली पण प्रत्यक्षात तितक्या प्रभावी दिसल्या नाहीत.
कमला यांना पाठिंबा देणाऱ्या माध्यमांकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केलं.
संबंधित बातमी:
Donald Trump : ट्रम्प निवडून आल्यानंतर भारतावर आणि जगावर काय परिणाम होणार? कुणाच्या खिशाला झळ बसणार?