एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचं निमंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारलं

भारताने रशियासोबत शस्त्रास्त्र खरेदी केल्याने आणि इराणमधून तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आला आहे.

वॉशिंगटन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण धुडकावलं आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास ट्रम्प यांच्यावतीने नकार देण्यात आल्याचं कळतं. अमेरिकेने नुकतंच या संदर्भात भारतीय अधिकाऱ्यांना एक पत्र सोपवलं आहे. या पत्रात ट्रम्प यांनी येऊ न शकल्याने खेद व्यक्त केला आहे. अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रम आणि स्टेट ऑफ यूनियनमधील ट्रम्प यांचं संबोधन, 26 जानेवारीच्या काही दिवस आधी किंवा नंतर होणार आहे. या कारणामुळे ट्रम्प यांनी मोदी सरकारचं आमंत्रण नाकारल्याचं सांगितलं जात आहे. भारताने रशियासोबत शस्त्रास्त्र खरेदी केल्याने आणि इराणमधून तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आला आहे. अमेरिकेच्या काऊंटरिंग अमेरिकाज एडवर्सरीज थ्रू सँक्शंस अॅक्ट (CAATSA)अंतर्गत बंदीची धमकी दिल्यानंतरही भारताने रशियासोबत S-400 करार केला आहे. या करारापूर्वी ट्रम्प 26 जानेवारीला भारतात येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु करारानंतर अमेरिकेची भूमिका पाहता, हा दौरा रद्द होऊ शकतो, असे कयासही बांधले जात होते. "डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात जाणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही," असं व्हाईट हाऊसकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 च्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांना हे निमंत्रण दिलं होतं. दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही "अध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात अधिकृत माहिती व्हाईट हाऊसमधूनच येईल," असं अमेरिकेतील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी 2015 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या व्यस्त कामांमधून वेळ काढून भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशाच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याची परंपरा आहे. 2015 मध्ये बराक ओबामा, 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद, 2017 मध्ये अबू धाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि 2018 मध्ये आसियान अर्थात आग्नेश आशियातील दहा देशांचे प्रमुख प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget