वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. 78 वर्षीय डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर, 56 वर्षीय भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.


आपल्या ट्विटर अकाऊंटवर 12 तासांच्या बंदीनंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले. ते म्हणाले, "जे लोक विचारत आहेत त्यांना मी सांगेन की मी 20 जानेवारीला शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही."


अमेरिकन काँग्रेसने गुरुवारी संयुक्त अधिवेशनात अध्यक्ष पदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्रपती पदासाठी कमला हॅरिस यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली. या घोषणेच्या काही तासांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंग (संसद भवन) वर हल्ला केला. या वेळी बरीच हिंसाचार झाला. या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.


US Capitol | ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेत संसदेत धुडगूस; हा देशद्रोह, बायडन यांची प्रतिक्रिया


अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला झाली. बायडेन आणि हॅरिस यांना 306 'इलेक्टोरल कॉलेज' मतं मिळाली, तर ट्रम्प आणि पेन्स यांना 232 'इलेक्टोरल कॉलेज' मते मिळाली.


वर्मोंटच्या तीन 'इलेक्टोरल कॉलेज'च्या मतांच्या संख्येने दोघांनाही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 270 हून अधिक जादुई आकड्यांच्या पार पोहचवले होते.




US Capitol | अमेरिकेतील गोंधळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले...


निवडणुकीच्या निकालांच्या संसदेच्या पडताळणीवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की आपण 20 जानेवारीला "सुव्यवस्थित" पद्धतीने सत्ता हस्तांतरित करू. ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "मी निवडणुकीच्या निकालांशी पूर्णपणे सहमत नाही आणि या विचारांवर मी ठाम आहे. तरीही 20 जानेवारीला पद्धतशीरपणे सत्ता हस्तांतरण होईल."