लंडन : ब्रिटनच्या ड्रग नियामक प्राधिकरणाने शुक्रवारी अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना निर्मित कोविड -19 लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ही ब्रिटनमध्ये मंजूर होणारी तिसरी कोरोना विषाणूची लस असेल. मॉडर्ना लसीच्या वापरास अमेरिकेत यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. आता यूकेमध्ये फायझर-बायोटेक आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका या लसींमध्ये लसीकरणात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. या दोन लसी गेल्या वर्षी मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) च्या लसीकरण मोहिमेमध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे.


कोरोना लसीकरणानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग राहणार का?


मार्चपर्यंत नवीन लसीचा पुरवठा होणे अवघड आहे. कारण ब्रिटनने 70 लाख डोसांची ऑर्डर दिली आहे. याचे उत्पादन प्रथम अमेरिकेत होत आहेत आणि युरोपमधील उत्पादनास थोडा वेळ लागू शकेल. मोडर्ना लसीच्या 30 हजाराहून अधिक लोकांवर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये ही कोरोना लस 95 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे.


मॉडर्ना कंपनीच्या कोविड लसीला अमेरीकेकडून हिरवा झेंडा


फाइजर आणि बायोएनटेक लसीसारखे काम करणारी मोडर्ना लस शून ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावी लागणार आहे. ब्रिटनमधील वापरासाठी आतापर्यंत मंजूर झालेल्या तीन लसींचे दोन डोस देण्यात येणार आहेत. यूकेमध्ये आतापर्यंत सुमारे 15 लाख लोकांना कोविड -19 लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे.