इस्लामाबाद: पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीऊर रेहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता.
दहशतवाद्यांना फंडिंग केल्या प्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी पथकाने (सीटीडी) झकीऊर रेहमान लखवीला अटक केली होती. दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवण्यात आल्याचा आरोप ठेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाच्या मते, झकीऊर रेहमान लखवीने दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्या माध्यमातून त्याने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले.
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराला आता संयुक्त राष्ट्र संघटना देणार महिन्याला दिड लाख रुपये
संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत झकीऊर रेहमान लखवी याचं नाव आहे. डिसेंबर 2008 साली संयुक्त राष्ट्र संघटनेनं झकीऊर रेहमान लखवीला आतंरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलं होतं. पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या मते लखवीवर एक दवाखाना चालवणे, त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करणे अशा प्रकारचे आरोप आहेत.
पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या करिमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड
जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईद याच्या नेतृत्वाखाली लश्कर-ए-तोयबाने 2008 साली मुंबई दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसोबत 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीऊर रेहमान लखवी होता.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दिड लाख रुपये देण्यास मंजुरी दिली होती. याशिवाय पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रती महिना पैसे देण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने मान्य केली होती. या दोघांना अशा प्रकारचा खर्च द्यावा अशी विनंती पाकिस्तानने केली होती.
पाकिस्तानात मंदिर तोडफोड प्रकरणी 26 जणांना अटक, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता