गर्भवतींसोबत डान्स करुन त्यांचा ताण आणि वेदना हलक्या करण्याचा डॉ. फर्नेंडोंचा प्रयास आहे. यासाठी ते गर्भवतींसोबत डान्स करतात. त्यांनी प्रेग्नंट महिलांसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या डॉक्टरसाहेबांना 'डान्सिंग डॉक्टर' या नावाने ओळखलं जातं.
प्रसुतीपूर्वी नाचल्यामुळे प्रसुतीच्या दरम्यान महिलेला आराम मिळतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. अंथरुणावरुन पडून न राहता चालत्या-फिरत्या राहणाऱ्या महिलांना प्रसुतीच्या काळात आराम मिळतो, असंही संशोधनातून सिद्ध झालं आहे.
डॉ. फर्नेंडो यांच्या डान्सच्या स्टेप्स अत्यंत सोप्या असतात. त्यामध्ये सोप्या व्यायामप्रकारांचा समावेश आहे.
पाहा व्हिडिओ :