Bmc Mayor Kishori Pednekar on Corona in Mumbai : मुंबईत कोरोना (Corona) रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती BMC महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar) यांनी दिली. 


गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्याबरोबरच BMC आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत 20 हजार कोरोना रूग्णांचा टप्पा पार झाला तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असे सांगितले. 





महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईत कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता मुंबईतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. कोरोना वाढत असला तरी घाबरण्याची गरज नाही. परंतु, वाढणाऱ्या रुग्णसंख्येची बाब चिंताजनक आहे. पालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. काल 15 ते 17 वयोगतील अडीच हजार मुलांचे लसीकरण झाले आहे. 


कोशोरी पेडणेकर म्हणाल्या, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक किंवा दोन दिवसांत सध्याच्या परिस्थितीवर बोलतील. कोरोनाविरोधात लढण्याची रुग्णालयांची पूर्ण तयारी झाली आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना रुग्णालयात आणि ज्यांना लक्षणं नाहीत त्यांना होम आयसोलेशनची सोय असेल. त्यानुसार बाधितांवर उपचार होतील. 


गर्दी टाळण्याचे आवाहन
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळली पाहिजे. शिवसेनेसुद्धा गर्दीचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इतर पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा गर्दी करु नका. दिलेल्या नियमात कार्यक्रम समारंभ उरका. त्याबरोबरच गर्दीचे कार्यक्रम टाळण्यासाठी आपण मोहीम हातात घेऊया असे आवाहान किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले. 


सुपर स्प्रेडर होणे टाळा
BMC आयुक्त स्वतः कोरोना परिस्थितीवर लक्ष देत आहेत. लॉकडाऊन कोणालाही नको आहे. आता कुठेतरी आपण सावरत आहोत. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येकाने ठरवावं की, गर्दी करणार नाही. मास्क घालेन व इतर नियमांचे पालन करेन. कोरोनाचे सुपर स्प्रेडर होणे टाळा, असे आव्हानही किशोरी पेडणेकर यांनी केले. 


महत्वाच्या बातम्या