पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचे चीनमधील माध्यमांकडून कौतुक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2016 08:51 AM (IST)
NEXT
PREV
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष नाराज असले, तरी चीन यावर भलताच खुश दिसत आहे. चीनच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. नोटबंदीचा निर्णय हा सर्वांना अश्चर्याचा धक्का देणारा असल्याचे ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केलेल्या लेखात म्हटलं आहे.
''नोटबंदीचा निर्णय सर्वांना अश्चर्याचा धक्का देणारा होता. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी हे एक धाडसी पाऊल होतं,'' असंही या लेखात म्हटलं आहे. याशिवाय भारताला चीनच्या भ्रष्टाचारविरोधी मोहीमेतून शिकले पाहिजे असंही या लेखातून सांगितलं आहे. ''कारण 2013 साली शी जिनपिंग यांनी चीनच्या राष्ट्रध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अनेक निर्णय घेतले. याला राजकीय विरोधही झाला,'' असल्याचे यात म्हटलं आहे.
या लेखात काळा पैशाच्या व्यवहारावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ''जवळपास सर्व अवैध कामे ही रोख रकमेतूनच होतात. त्यासाठी 500 आणि 1000 रुपयांसारख्या नोटांचा यामध्ये सर्रास वापर होतो. सध्या भारतातील या चलनी नोटांचे प्रमाण 80 टक्के दिले आहे.'' असं या लेखातून सांगितलं आहे.
दरम्यान, मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही सर्वत्र चर्चा होत आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानातूनही मोठा नोटा चलनातून रद्द कराव्यात ही मागणी जोर धरत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -