Apple Chip Supplier TSMC Data Breach : जगप्रसिद्ध अॅपल कंपनीची चिप पुरवठादार असलेल्या तैवान सेमिकंडक्टर मॅन्यूफॅक्चरींग कंपनीचा डेटा चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. टीएसएमसी या चिप उत्पादक कंपनीच्या डेटाची चोरी करणाऱ्या गँगचं नाव लॉकबिट रॅन्समवेअर असून ती रशियातील असल्याचं सांगितलं जातं. लॅाकबिट रॅन्समवेअर गँगने TSMC च्या डेटा चोरीची माहिती उघडकीस केल्यावर आता  TSMC ने देखील डेटा चोरी झाल्याचे  मान्य केले आहे.


तैवान सेमिकंडक्टर मॅन्यूफॅक्चरींग कंपनी (TSMC) ही जगातील सर्वात मोठी कॅान्ट्रॅक्ट चिप उत्पादक कंपनी आहे.जगातील 60 टक्के सेमिकंडक्टर मार्केट हे TSMC च्या नियंत्रणाखाली आहे. ही अॅपल कंपनीचीही चिप पुरवठादार कंपनी आहे. आहे. TSMC ही अॅपलच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये वापरली जाणारी  A सिरीज आणि M सिरीज च्या चिप बनवते.


टेकक्रंच या अमेरिकन ऑनलाईन वृत्तपत्रानुसार,  गुरुवारी लॅाकबिट रॅन्समवेअर गँगने TSMC चा डेटा चोरल्याचा दवा डार्कवेबवर जाहीर केलं, आणि  574 कोटींची खंडणी मागितली आणि ही खंडणी न दिल्यास त्यांच्या कंपनीचा डेटा सर्वत्र प्रकाशित करण्यात येईल अशी धमकीही दिली. एवढंच नाही तर खंडणीची रक्कम न दिल्यास नेटवर्कचे पासवर्ड आणि लॉगिन कंपनी देखील डार्कवेबवर जाहीर करण्याचं आव्हान दिलंय. परंतु डेटा चोरल्याचा दावा करणाऱ्या रॅन्समवेअर गँगने  डेटा चोरीचा कोणताही पुरावा दिलेला नाही.


किनमॅक्स टेक्नॉलॉजी या टीएसएमसीच्या आयटी हार्डवेअर पुरवठादारांपैकी एका कंपनीच्या सायबर सर्व्हरमधील त्रुटीमुळे प्रारंभिक सेटअप आणि कॉन्फिगरेशनशी संबंधित माहिती लीक झाली, असे TSMC च्या प्रवक्त्याने संगितलं. 


या घटनेचा TSMC च्या व्यवसाय किंवा दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावाही या प्रवक्त्याने केला. TSMC च्या ग्राहकांच्या माहितीशी तडजोड झाली नसल्याचं प्रवक्त्याने स्पष्ट केलं. या घटनेनंतर, TSMC ने कंपनीच्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि कार्यपद्धतीनुसार या संबंधित पुरवठादारासोबतचा डेटा एक्सचेंज तातडीने बंद केलं आहे.


याशिवाय टेकक्रंचच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे की, TSMC ने  नेटवर्किंग, क्लाउड कंप्युटिंग, स्टोरेज, सुरक्षा आणि डेटाबेस व्यवस्थापनात तज्ञ असलेल्या किनमॅक्स  टेक्नॉलॉजी या IT सेवा आणि सल्लागार कंपनीसोबत झालेल्या कराराची प्रत ही सार्वजनिक केली आहे.


लीक झालेल्या  माहितीमध्ये मुख्यत्वे सिस्टम इंस्टॉलेशनबाबतची माहिती असते जी कंपनी सर्व ग्राहकांना डीफॉल्ट कॉन्फिगरेशन म्हणून देत असते, त्याचा समावेश असल्याचा दावा टीएसएमसीच्या प्रवक्त्याने केला.


दरम्यान, यूकेच्या मँचेस्टर विद्यापीठाने सांगितलं की जून महिन्याच्या सुरुवातीला उघड झालेल्या सायबर हल्ल्यामागील हल्लेखोरांनी, काही विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांशी संबंधित डेटा चोरला होता.


ही बातमी वाचा: