क्यूबामध्ये विमान दुर्घटने जवळपास 105 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धावपट्टीवरुन उड्डाण करतानाच, शुक्रवारी ही भीषण दुर्घटना घडली.
या विमानात 104 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर होते.
हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर बोईंग 737 हे विमान काही क्षणातच कोसळलं. अपघातग्रस्त विमान हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते.
धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने, विमानाने पेट घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरले.
काही महिन्यांपूर्वीच या विमान कंपनीने जुनी विमानं सेवेतून बाहेर केली होती. तांत्रिक बिघाडाचं कारण देत, ती सेवेतून रद्द केली होती.
मात्र कालचा हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची कारणं तपासली जात आहेत. पण या भीषण अपघाताने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यात अल्जेरियातही अशी भीषण विमान दुर्घटना झाली होती. मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 257 सैनिकांचा मृत्यू झाला होता.
तर मार्च महिन्यात बांगलादेशचं विमान नेपाळमध्ये कोसळून 50 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या
अल्जेरियात विमान कोसळलं, 257 सैनिकांचा मृत्यू
बांगलादेशचं विमान नेपाळमध्ये कोसळलं, 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
बॅचलर पार्टीला गेलेल्या उद्योजिकेचा मैत्रिणींसह विमान अपघातात मृत्यू
क्यूबात विमान कोसळलं, 105 प्रवाशांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2018 08:30 AM (IST)
हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर बोईंग 737 हे विमान काही क्षणातच कोसळलं. अपघातग्रस्त विमान हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -