Bill Gates On Covid19 : जगभरात कोरोनाचे (Coronavirus) संकट वाढतच चालल्याचं पाहायला मिळत आहे. कोविड-19 (Covid19) महामारीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, बिल गेट्स (Bill Gates) यांनी भविष्यातील महामारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांचा विश्वास आहे की, भविष्यात कोरोना विषाणूपेक्षाही वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. गेट्स फाऊंडेशन आणि ब्रिटीश बायोमेडिकल धर्मादाय संस्था वेलकम यांनी मंगळवारी कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आणि भविष्यातील साथीच्या रोगांच्या तयारीसाठी 150 दशलक्ष डॉलरची देणगी दिली. ही रक्कम भविष्यात उद्धभवणाऱ्या महामारीची पूर्वतयारी करणाऱ्या CEPI (Coalition for Epidemic Preparedness Innovation) संस्थेला देण्यात आली आहे.
यावेळी बिल गेट्स यांनी भविष्यातील महामारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या उद्रेकादरम्यान, CEPI ला दान केलेली रक्कम कोविड संसर्गाविरुद्धच्या लढाईसाठी वापरली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच भविष्यातील साथीच्या आजारांसाठीही संघटना तयारी करणार आहे.
बिल गेट्स म्हणाले की, संपूर्ण जग वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कोरोना लसींमुळे अनेक जणांचे प्राण वाचले आहेत आणि कोरोनाच्या संसर्गातून खूप लवकर बाहेर पडले आहेत. विकसनशील देशांना तितक्या लवकर लस मिळाली नाही, असेही ते म्हणाले.
इतर बातम्या :
- America : एका प्रवाशाने केली मास्क न घालण्याची चूक, अर्ध्या रस्त्यातूनच परतलं विमान
- Priyanka Chopra : गूड न्यूज! अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
- Srivalli : तुझी झलक अशरफी! श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनची धूम; पोलीस कॉन्स्टेबलने तयार केलेलं गाणं तुफान व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha