Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सरोगसीच्या (Surrogacy) माध्यमातून ही अभिनेत्री आई झाली. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना त्यांनी प्रत्येकाने आपली गोपनीयता राखण्याचे आवाहनही केले. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ही खुशखबर तिच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने लिहिले की, 'आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे सरोगसीद्वारे स्वागत केले आहे.


प्रियांकाने गूड न्यूज शेअर करत पुढे लिहिले की, 'आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो, कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!' ही बातमी येताच सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात झाली आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha