US Covid19 Guidelines : जगभरात कोरोना महामारीच्या संक्रमणादरम्यान नागरिकांना कोविड-19 निर्बंधांचाही सामना करावा लागत आहे. काही लोक अजूनही कोविड नियमांचे योग्य प्रकारे पालन करत नाहीत. दरम्यान, अमेरिकेतील एका विमान प्रवाशाच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे वैमानिकाला विमान परत न्यावे लागले. विमानातील प्रवाशाने तोंडाला मास्क लावला नाही, त्यामुळे वैमानिकाला उड्डाण केलेले विमान अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरवावे लागले. मियामीहून लंडनला जाणारे अमेरिकन एअरलाईन्सचे जेटलाईनर उड्डाणानंतर अर्ध्यातून माघारी परतले. 


मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे की, विमानातील एका प्रवाशाने कोविड नियमांनुसार मास्क घालण्यास विरोध दर्शवला होता, त्यानंतर हा विमान माघारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकन एअरलाईन्सचे जेटलाईनरने माहिती देताना सांगितले की, अमेरिकन एअरलाईन्सची फ्लाईट 38 मियामी ते लंडनची सेवेदरम्यान एका प्रवाशाने मास्क परिधान न करण्याच्या आग्रह कायम ठेवला परिणामी एअरलाईन्सने फ्लाईट माघारी बोलावली. 


पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, विमान उतरल्यावर पोलिसांनी कोणताही वाद न करता प्रवाशाला विमानातून खाली उतरवले. त्यानंतर इतर 129 प्रवासी आणि 14 कर्मचारी घेऊन बोईंग 777 मियामीमध्ये परत आले. अमेरिकन जेटलाईनर एअरलाईन्सने माहिती दिली आहे की, पुढील तपास होईपर्यंत मास्क न घातलेल्या या प्रवाशाला एअरलाईन्सने उड्डाण करण्यावर बंदी असेल.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha