Covid19 relief program : अमेरिकेत सरकारच्या कोविड-19 रिलीफ प्रोग्राममधील (Covid-19 Relief Program) 200 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेची चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेडरल वॉचडॉगच्या (Federal Watchdog) अहवालानुसार अमेरिकेत वितरित केलेल्या सर्व लघु व्यवसाय प्रशासन निधीपैकी जवळपास एक पंचमांश कोविड रिलीफ लोन आणि अनुदानांमध्ये 200 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम फसवणूक करणार्‍यांना वितरित केली आहे. विशेष म्हणजे या कोविड-19 रिलीफ प्रोग्राममुळे लघु उद्योगांना या महामारीतून बाहेर पडण्यास मदत झाली होती.


US Covid19 relief program | 17 टक्के रक्कम फसवणूक करणाऱ्यांना वितरित


स्मॉल बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Small Business Administration) अर्थात लघु व्यवसाय प्रशासनाच्या महानिरीक्षक कार्यालयाने मंगळवारी (27 जून) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सरकारच्या कोरोनाव्हायरस इकॉनॉमिक इंजुरी डिझास्टर लोन (EIDL) आणि पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम (PPP) योजनांशी संबंधित सर्व निधीपैकी किमान 17 टक्के रक्कम फसवणूक करणाऱ्यांना वितरित झाली आहे. कोरोना महामारीच्या (Covid 19 Pandemic) काळात, SBA ने सुमारे 1.2 ट्रिलियन डॉलर्स इतका EIDL आणि PPP निधी वितरित केला होता. ही आकडेवारी वॉचडॉगच्या केस वर्क, पूर्वीचे अहवाल आणि अॅडव्हान्स डेटा अॅनालिसिसवर आधारित आहे. 


86 टक्क्यांपेक्षा जास्त फसवणूक 2020 मध्ये झाल्याचा SBA चा दावा


दरम्यान फेडरल वॉचडॉगने मांडलेल्या 200 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेबाबत एसबीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आक्षेप नोंदवला आहे. SBA चे कार्यवाहक सहयोगी प्रशासक बेली डेव्हरीज म्हणाले की, "महानिरीक्षकांच्या दृष्टिकोनात गंभीर त्रुटी आहेत, ज्यामुळे फसवणुकीची अतिशयोक्ती केली आहे. शिवाय आम्ही एकत्रितपणे केलेल्या कामाचा फसवणुकीपासून संरक्षण करण्यात कोणताही लक्षणीय परिणाम झाला नाही, असा संदेश जाऊन लोकांची अनावधानाने दिशाभूल होत आहे." एसबीएने म्हटलं आहे की, "आमच्या तज्ज्ञांनी फसवणुकीची अंदाजित रक्कम 36 अब्ज डॉलर्स एवढी वर्तवली आहे. तर 86 टक्क्यांपेक्षा जास्त फसवणूक ही 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होते त्यावेळी झाली होती. तर जो बायडेन यांनी जानेवारी 2021 मध्ये पदभार स्वीकारला होता."


EIDL कार्यक्रमात अंदाजे 36 अब्ज डॉलर्स तर PPP मधील 64 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेची फसवणूक


EIDL कार्यक्रमात अंदाजे 136 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली तर PPP मधील फसवणुकीचा अंदाज 64 अब्ज डॉलर्स असावा, असं एसबीएच्या महानिरीक्षकांनी म्हटलं आहे. यूएस सरकारच्या सहाय्य कार्यक्रमांबद्दलच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. मे 2021 मध्ये, अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी COVID-19 फसवणूक अंमलबजावणी टास्क फोर्सची स्थापना केली होती.


हेही वाचा