Russia Ukraine Conflict: रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस असून हे युद्ध अजूनतरी थांबण्याचं नाव घेईना. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा जगातील इतर राष्ट्रांना या वादात न पडण्याची ताकीद दिली आहे. 'युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा करणारं कोणतंही राष्ट्र हे थेट रशिया-युक्रेन वादात पडल्याचं गृहीत धरु', असं पुतिन यांनी म्हटलं आहे.  


जगभरातील विविध देश तसंच संस्था युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत असून आतापर्यंत तरी जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांना युद्धामुळे हाणी सहन करावी लागत आहे. दरम्यान अशामध्ये युक्रेनला 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्याची मागणी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. मात्र, नाटोने या मागणीला नकार दिला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान आता पुतिन यांनी या नो फ्लाय झोनबाबत बोलताना युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करणारा कोणताही देश या युद्धात पडल्याचं समजलं जाईल, असं पुतिन म्हणाले.  


युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'साठी नाटोचा नकार का?


युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा केल्याने रशियासोबत उघडपणे लष्करी संघर्ष होऊ शकतो अशी भीती 'नाटो'ला आहे. युक्रेनपर्यंत मर्यादित असणारा संघर्ष हा युरोपमध्ये फैलावू शकतो. 'नाटो' आपल्या मोहिमेला बळ देण्यासाठी रिफ्युलिंग टँकर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स-सर्व्हिलान्स एअरक्राफ्ट देखील तैनात करावे लागतील. त्यांच्या सुरक्षितेसाठी 'नाटो'ला रशिया आणि बेलारुसमध्ये जमिनीहून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना नष्ट करावे लागतील. त्यामुळे आणखी तणाव वाढू शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha