Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकल्या. राज्यभरात झालेल्या...More
पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.
गोंदिया फ्लॅश
देशात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे... अशातच गोंदिया जिल्ह्यात देखील 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.. मात्र, या दोन्ही रुग्णांचे लक्षण अगदी सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक त्या काळजी घेण्याच्या आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे... या दोन रुग्णांपैकी एका रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची तपासणी केली असता ती पॉझिटिव आली असून एक रुग्ण नागपूर येथे तपासणी केली असता पॉझिटिव्ह आले आहे.. साधारणतः दोन्ही रुग्णांची वय 60 च्या वर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे... तर या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांना विचारले असता दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती खरी आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे...
धुळे
फारशी पुलावरून कार पांझरा नदी पात्रात पलटी....गुगल मॅप पाहत असताना झाला अपघात...कार चालक गंभीर जखमी....
धुळे शहरातील पांझरा नदीवर असलेल्या फरशी पुलावरून कार नदीत पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर कार चालक कार चालवताना मोबाईलवर मित्राने पाठवलेल्या गुगल मॅप पाहत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नसून कार चालक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी तत्काळ स्थानिक नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परभणी येथील रहिवाशी असलेला काशिनाथ धुळगांडे हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी धुळे येथे आला असताना हा अपघात झाला असल्याची माहिती त्याच्या निकटवर्ती यांनी दिली आहे... घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते..
भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा
याआधी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली होती
मात्र, 22 जागांसंदर्भात अंतर्गत वाद असल्याने यादी रोखून धरण्यात आली होती
काही जिल्ह्यांच्या संदर्भात निर्णय पूर्ण झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे
दरम्यान, दोन दिवसांआधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उर्वरित भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीसंदर्भात चर्चा झाली होती
यावेळी, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची हजेरी होती
सातारा: किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने मध्यरात्री हटवले. काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढले असून, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये गड किल्ले तसेच अतिक्रमण केलेल्या जागांवरील बांधकामावर हातोडा टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण व अतिक्रमण केलेली जागा अडीच वर्षांपूर्वी पोलिस बंदोबस्तात पहाटेच भुईसपाट करण्यात आली होती. त्यानंतरही गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर होती. आणि अशातून आता अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी अनधिकृत दोन थडगी जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत.
पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील तीन जून पर्यंत पोलीस कोठडी..
काही वेळापूर्वी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं..
सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे. या ग्राउंडवर कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी दोघांना वाढवून देण्यात आली आहे..
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात .
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारची कंटेनरला मागून जोरदार धडक.
अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी .
मृतांमध्ये दोन महिलांचा तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश .
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता .
अपघातात डस्टर कारचा चक्काचूर .
पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीतील घटना .
लड्डा यांच्या घरातील सोन्याची आणि पैशाची टीप देणारा निघाला संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र. दोघांनी घेतलं सोबत शिक्षण लड्ड्यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या बालासाहेब यांनीच दिली पहिली टीप. डिसेंबर महिन्यात संतोष लाटा किरकोळ कारणावरून रागावल्यानं बालासाहेब ला आला होता राग..
संभाजीनगर पोलिसांकडून आज चार जणांना केली अटक
1. बालासाहेब चंद्रकांत इंगोले , वय 46 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. सूर्यवंशी नगर सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
2-आजिनाथ पुंजाराम जाधव, वय 22 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान रा. सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
3. गणेश गंगाधर गोराडे, वय 22 वर्ष, व्यवसाय खा नोकरी, रा. सिडको वाळूज महानगर एक जिजामाता नगर, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर
4 महेश दादाराव गोराडे, वय 26 वर्ष, व्यवसाय मेडिकल चालक, रा. वडगाव कोल्हाटी ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
5 देविदास शिंदे याला सांगतील
कोण आहे इंगोले
बालासाहेब चंद्रकांत इंगोले
कंपनीमध्ये कटिंग इंचार्ज
जवळचा मित्र सोबत शिक्षण घेत होता.
20 वर्षांपासून त्याच्या कंपनीत काम करत होता. त्याच्या घरी भाजीपाला घेवून जात होता. त्याला घरातल्या पैसे , आणि सोन्याची माहिती.
याने दिली पहिली टीप.
धाराशिव शहरात भरधाव कारमध्ये अर्धनग्न तरुणांच्या हुल्लडबाजीचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. शहराचा मुख्य मार्ग असलेल्या भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग रस्त्यावर चालत्या गाडीत हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत अशोभनीय वर्तन केले. या तरुणांनी रस्त्यावर विचित्र हावभाव करत कपडे काढून अंगप्रदर्शन केले. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर या तरुणांनी टवाळखोरी केली तो रस्ता पोलीस स्थानकाच्या समोरून जातोय. या प्रकारामुळे सार्वजनिक शिस्तीचा आणि नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील मुठा नदीवरील पूल पाडला
ओंकारेश्वर घाट आणि रिद्धी सिद्धी ला जोडणारा पूल अखेर पाडायला सुरुवात
हा पूल ५५ वर्षेपूर्वीचा आहे
पुलांची लांबी जवळपास ५० मीटर लांब
सदर पूल हा धोकादायक स्थितीत होता
या पुलाचा वाहतुकीसाठी वापर होत नव्हता
नदी सुधार प्रकल्पात हा जुना पूल अडथळा ठरत असल्याने पूल काढून टाकला जात आहे
मंदिरात जात दानपेटीची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी या आरोपीने एका मंदिरात जात केली होती दानपेटीची चोरी
महादेव तुकाराम गिरमकर असं अटक करण्यात आलेल्या दानपेटी चोराचे नाव
आरोपी हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असून गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील अनेक मंदिराची पाहणी आरोपीने केली असल्याची पोलीस चौकशीत समोर
दानपेटी मध्ये चोरलेली रक्कम घेऊन जाताना स्वारगेट बस स्टैंडवर पुणे पोलिसांनी आरोपीला केली अटक
पुण्यातील मुकुंद नगर परिसरात आरोपीने मंदिरात जात मध्यरात्री दानपेटी फोडून केली होती रोख रकमेची चोरी
सदर आरोपीने पुणे जिल्ह्यातील आणखीन दोन मंदिरात देखील चोरी केल्याची पोलिसांसमोर दिली कबुली
Pune News : पुण्यातील पर्यटकांसाठी महत्वाचा असणार सिंहगड किल्ला आज पासून तीन दिवस बंद असणार आहे . गडावरील अनधिकृत बांधकाम काढण्याच काम सुरू आहे त्यामुळ ३० मे पासून सिहगड किल्ला बंद ठेवण्यात आला होता. मात्र या कामाला आणखीन वेळ लागणार असल्याने आणखीन तीन दिवस किल्ला बंद ठेवण्यात आलाय.त्यामुळे आज शनिवार आहे सुट्टी असल्यामुळे अनेकजण किल्ल्यावर जाण्यासाठी येत आहे मात्र त्याना पुन्हा माघारी फिरावं लागत आहे.
सातारा: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचा वतीने करण्यात आले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल प्रवासादरम्यान प्रवाशाच्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारून मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली रेल्वे पोलिस पथकाने रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत . सुमित सिंह असे या चोरट्याचे नाव असून या चोरट्याने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो लोकलमध्ये दरवाजात उभा असलेल्या प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारला व मोबाईल हिसकावून पलायन केले मात्र गस्त घालत असलेल्या डोंबिवली रेल्वे पोलिसांनी या चोरट्याचा पाठलाग करून त्याला अटक करत त्याच्याकडून हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात
कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास केली सुरुवात
विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून चर्चेत
साईबाबा संस्थानच्या लेखाविभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचे उघडकीस आले आहे.. बाळासाहेब नारायण गोंदकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने 4, 8 आणि 11 एप्रिलला दक्षिणा मोजणीदरम्यान पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि आणि नंतर ते चोरून नेल्याचे तपासात समोर आले आहे.. 16 एप्रिलला दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशीनमध्ये 46 हजार 500 रुपये आणि आणि 25 एप्रिलला 50 हजार रुपयांचा आणखी एक बंडल आढळून आला.. या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले.. त्यांनी नोटा मांडीखाली, पँटमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार गोंदकर याच्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचे नाव जवळपास निश्चित मात्र भाजपा मुंबई अध्यक्ष ठरेना
मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी तीन नावांची चर्चा मात्र अद्याप निर्णय नाही
प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता आशिष शेलार यांच्यावरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची का? की नवा मुंबई अध्यक्ष नेमावा याबाबत अजूनही पक्षात चर्चा सुरु
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये संघर्ष
बाजार समिरीत भ्रष्टाचार होत असल्याचा बाजार समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचा आरोप
-
बाजार समितीचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी
देविदास पिंगळे यांनी दिले पणन मंत्री जयकुमार रावल याना पत्र
पत्राचा आधार घेत 3 आठवड्यात चौकशी करण्याचे पणन मंत्री यांचे जिल्हा उप निबंधकांना आदेश
मागील।एप्रिल महिन्यात 2 कोटी 30 लाख उत्पन्न बाजार समितीला झाले होते
यंदाच्या एप्रिलला महिन्यात 40 लाख रुपयांनी उत्पन्न घटल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या देविदास पिंगळे यांचा आरोप
मार्च महिन्यात देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणत त्यांची सत्ता उलथवून भाजपच्या कल्पना चुंभळे झाल्या होत्या सभापती
तेव्हापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष सुरू
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे... 2 दिवसांनंतर मान्सूनपूर्व पावसाने गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे... सध्या गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामातील अनेक ठिकाणची धानपिक कापून झाली असली तरी मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी मळणी केली नाही त्याच्यामुळे याचा फटका धान पिकाला बसण्याची आहे शक्यता आहे... तर दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केंद्रावर धान विकण्याकरिता ठेवले असल्याने या धानाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
Parbhani News : परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे पावसाळ्यामध्ये तर ही परिस्थिती इतकी भीषण होते की नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो परभणीच्या आर्वी ते पेडगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्याला दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पाणी आले होते यावेळी नागरिकांना दोरीच्या साह्याने आपला जीव धोक्यात घालून हा रस्ता ओलांडावा लागलाय त्यामुळे कित्येक वर्ष मागणी करूनही आंदोलन करूनही रस्ता मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आर्वी ते पेडगाव याच रस्त्याचा हा प्रश्न नाही तर जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे याकडे शासन स्तरावरून लक्ष देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.
तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग च्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य असलेला नर-मादी धबधब्यापैकी मादी धबधबा हा प्रवाहित झाला आहे.हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे.गेली पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असुन त्यामुळे बोरी नदीवरील किल्ल्यातील मादी हा धबधबा प्रवाहित झाला आहे.हे पाणी जवळपास 70 ते 100 फुट खाली फेसाळत जाऊन आदळते हे दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत.
Crime News: अकरा वर्षाय चिमुकली स्वतःच्या घरासमोर खेळत असताना त्याचं वार्डात राहणाऱ्या ३० वर्षीय इसमानं तिला बळजबरीनं उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीनं पळ काढला. ही घटना १६ मे ला भंडाऱ्याच्या तुमसर शहरात घडली. त्यानंतर आरोपीनं पीडितेच्या कुटुंबियांना धमकी दिल्यानं पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र, याप्रकरणी काल पीडितेच्या कुटुंबीयांनी तुमसर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन सहारे (३०) याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून तुमसर पोलिसांचं पथक त्याच्या शोधात रवाना करण्यात आलं आहे.
तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग च्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य असलेला नर-मादी धबधब्यापैकी मादी धबधबा हा प्रवाहित झाला आहे.हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे.गेली पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असुन त्यामुळे बोरी नदीवरील किल्ल्यातील मादी हा धबधबा प्रवाहित झाला आहे.हे पाणी जवळपास 70 ते 100 फुट खाली फेसाळत जाऊन आदळते हे दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो उन्हाळी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना. यामध्ये रुईभर येतील तीर्थकर यांच्या शेतात साडेसात एकर क्षेत्रावरील तिळाला मोठा फटका बसलाय. पावसामुळे तिळावर रोग पडला. ऊन आणि पावसामुळे काढण्या अगोदरच तीळ जमिनीवर सांडायला सुरुवात झाली. पांढराशुभ्र होणारा उन्हाळी तिळ आता पावसाने काळवंडला. तीर्थकर यांच्या शेतातील कोथिंबीर आणि मूग पिकाचा देखील नुकसान झाले.
वसमत शहरातील कारखाना रोड परिसरामध्ये एका सीटर मध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधून ऑटो मध्ये भरला जात आहे ही बाब लक्षात येतात पुरवठा विभाग आणि वसमत पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी या कारवाईमध्ये एकूण नऊ घरगुती वापरायचे तीन गॅस सिलेंडर , रिफील मशीन, वजन काटा यासह एक ऑटो पोलिसांनी जप्त केला आहे या कार्यवाही मुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे वसमत शहरात सर्रास पने आशा पध्द्तीने अवैधपणे ऑटो मध्ये गॅस भरला जातोय यामुळे मोठी अनुचित घटन घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याचे बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावात कुटुंबासोबत वास्तव्य आहे.. अविनाशचे आई वडील याच मांडवा गावात राहतात.. भारताला गोल्ड मेडल मिळवून दिल्याने अविनाशवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय..
दुसरीकडे मात्र अविनाशच्या घराकडे जाणारी वाट खडतर आहे.. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी केली जातेय. मात्र मांडवा गावात जाण्यासाठी रस्ता नाही.. पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होते.. त्यामुळे अविनाश च्या वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच रस्त्यासाठी साकडे घातले आहेत.
निलेश चव्हाणचा माग कसा काढला?
- 25 मे ला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.
- गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.
- पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.
- 30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले. त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या.
बीड जिल्ह्यात मे महिन्यातच पावसाने कहर केलाय. मागील पंधरा दिवसात वार्षिक सरासरीच्या 36 टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी बागायती क्षेत्रातील पिके आणि फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील 187 गावांना याचा फटका बसला असून 3930 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. दरम्यान अद्याप पंचनामे सुरु असून ही नुकसान पाच हजार हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.. तर वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला असून 79 जनावरे दगावले आहेत..
दरम्यान शेती मध्ये आधुनिक प्रयोग म्हणून अनेक शेतकऱ्यांचा फळबाग आणि भाजपाला वर्गीय पिकांकडे कल आहे. मात्र या पावसाने आंबा, डाळिंब, मोसंबी यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठ्या दरोड्याचं प्रकरण. दरोड्यातील आरोपी पैकी एक आरोपी पोलिसांना देत होता हप्ते. या हप्त्यांची यादी 2023 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जाहीर केली होती. संभाजीनगर पोलीस प्रति महिन्याला अवैध धंद्यातून साठ लाख रुपये हप्ता घेत असल्याची एक यादी जाहीर केली होती.. त्यामध्ये देशी दारू विकण्यासाठी यातील आरोपी योगेश हसबे हा प्रती महिना 20 हजार रुपयांचा हप्ता देत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता.. लड्डा यांच्या घरी साडेपाच किलो सोन्यावर डल्ला मारणारा योगेश हसबे याला मिळाली होती घरात मोठं घबाड असल्याची टीप
- भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटविण्यास न्यायालयाकडून १७ जूनपर्यंत स्थगिती..
- महसूल, पोलिस, महापालिका प्रशासनाकडून आज राबविण्यात येणार होती अतिक्रमण निर्मूलन मोहीम..
- अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्त स्थगित..
- किल्ल्यातील २३५ झोपडपट्टी धारकांनी दाखल केली होती उच्च न्यायालयात याचिका..
- १७ जूनपर्यंत अतिक्रमण काढण्यास स्थगिती...
- १० जूनपर्यंत अतिक्रमण धारकांसाठी पर्यायी जागे संदर्भात काय उपाय योजना केल्या हे उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश..
- सुरुवातीला मायनॉरिटी डिफेन्स कमिटी कडून १३३ झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यास मिळाली होती न्यायालयाकडून स्थगिती...
- नंतर आ.मौलाना मुफ्ती यांच्या पुढाकारातून उर्वरित २३५ झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यास मिळाली स्थगिती..
- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम..
- किल्ला बचाव समितीने अतिक्रमण काढण्यासाठी दिला होता लढा..
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचलेत. गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली अन पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेली दहा दिवस तीन राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहचला होता, तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला अन तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि ऍन्टी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकण्यात आल्या अन पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा
तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी
यावेळी दोघे कट्टर विरोधक आले आमने-सामने
रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला
दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही
यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते
तर पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती रोहित पवार यांची प्रतिक्रिया
अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलंय.. थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.. सुनील कमलाकर असं मारेकरी काकाचं नाव आहे.. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.. दरम्यान, कुणाल बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वी दाखल होतीय. मात्र, त्यानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपासादरम्यान हा काकानेच पुतण्याची हत्या केल्याचं उघड झालंय.. या प्रकरणात खदान पोलिस अधिक तपास करतायेत..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...