मुंबई : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला असून त्याची तयारी सुरु झाल्याची माहिती अर्थराज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आली. मात्र भारतापूर्वीही काही देशांमध्ये प्लास्टिक चलन वापरलं जात आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, फिजी, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी, रोमानिया, व्हिएतनाम, इंग्लंड, रोमानिया यासारख्या किमान 20 देशांचा यात प्रामुख्याने समावेश होतो.

ऑस्ट्रेलिया हा जगात पहिल्यांदा प्लास्टिक चलन वापराला सुरुवात करणारा देश आहे. ऑस्ट्रेलियात 1996 पासूनच प्लास्टिक चलन वापरलं जातं.

ब्रुनेई या देशानेसुद्धा 1996 मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा प्लास्टिकच्या कमी किमतीच्या नोटांपासून सुरुवात झाली. तर 2007 पासून या देशात सर्वच नोटा या प्लास्टिकच्याच वापरल्या जातात. ब्रुनेई हा आग्नेय आशियाई देश असून इंडोनेशियाच्या जवळ आहे. ब्रुनेई हे एक मुस्लीम राष्ट्र आहे.

पापुआ न्यू गिनी या देशाचं चलन आहे 'किना'. दोन किनाच्या नोटा पापुआ न्यू गिनीने 1991 मध्ये चलनात आणल्या. त्याला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून 2008 पासून सगळंच चलन हे प्लास्टिकमध्ये आणलं.

रोमानिया हा प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात करणारा पहिला युरोपिय देश ठरला. रोमानियाच्या चलनाला रिऊ म्हणतात. 1999 ते 2001 अशा तीन वर्षात कागदी चलन रद्द करून प्लॅस्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली.

न्यूझीलंड या देशाचं चलन आहे न्यूझीलंड डॉलर. एक आधुनिक देश असूनही या देशानं 1999 पर्यंत कधीही प्लास्टिकच्या चलनाचा विचार केलेला नव्हता. 1999 च्या मध्यात न्यूझिलंडने 20 न्यूझीलंड डॉलरची नोट चलनात आणली. पण त्याला मिळालेला प्रतिसाद पासून रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने केवळ बारा महिन्यांतच आपलं संपूर्ण चलन हे प्लास्टिकमध्ये बदललं.

व्हिएतनाम हा असा देश आहे तो कित्येक दशकं युद्धाच्या छायेत राहिला, पण निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षात व्हिएतनामने आपलं कागदी चलन हे बंद केलं आणि आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली. व्हिएतनामच्या चलनाला डाँग म्हणतात. 2003 ते 2006 अशा तीन वर्षात मिळून या देशाने आपलं चलन बदललं.

इतर देशातील प्लास्टिक नोटांचे फोटो पाहा


संबंधित बातम्या :


प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात, सरकारची संसदेत माहिती