मुंबई : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम पर्सन ऑफ द ईअर 2016 म्हणून निवडण्यात आलं आहे. टाईमच्या पर्सन ऑफ द ईअर शर्यतीत पंतप्रधान मोदी पूर्वीच जिंकले होते. मात्र एडिटर्स रँकिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे.
टाईम मॅगझीनच्या रिडर्स पोलमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक 18 टक्के मत मिळाली होती. वाचकांच्या ऑनलाईन पोलमध्ये दुसऱ्यांदा मोदींना विजय मिळाला होता. तर सलग चौथ्यांदा मोदी पर्सन ऑफ द ईअरच्या शर्यतीत होते.
टाईम पर्सन ऑफ द ईअर 1927 साली पहिल्यांदा देण्यात आला. महात्मा गांधी 1930 मध्ये हा खिताब जिंकणारे पहिले भारतीय ठरले होते. 1999 पर्यंत टाईम मॅन ऑफ द ईअर या नावाने हा खिताब देण्यात येत होता.