Countries Ban Hijab : कर्नाटकात (Karnataka) हिजाबचा (Hijab) वाद चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकारच्या (karnataka government) वतीने स्पष्ट सांगण्यात आलंय की, शाळा आणि कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब परिधान करता येणार नाही. दरम्यान, जगात असे अनेक देश आहेत. जिथे हिजाबवर बंदी आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये (europian countries) हिजाब घालण्यावर किंवा चेहरा झाकण्यावरही बंधने आहेत. काही देशांमध्ये, चेहरा झाकणे किंवा हिजाब घालण्याविरुद्ध दंडाची तरतूद आहे. जाणून घेऊया असे कोणते देश आहेत? जिथे हिजाबला बंदी आहे. 


रशिया आणि फ्रान्समध्येही हिजाबवर बंदी


जगातील विविध देशांतील सरकार हिजाब घालण्याच्या विरोधात आहे आणि त्याचे पालन करण्यासाठी नियमही बनवण्यात आले आहेत. रशियातील काही शहरांमध्ये 2012 मध्ये शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. ज्यावर कोर्टानेही या निर्णयाला योग्य ठरवत हिजाब घालण्यावरची बंदी कायम ठेवली. फ्रान्समध्येही 2004 साली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धर्माशी संबंधित वस्त्र परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. 2011 मध्ये, फ्रेंच सरकारने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावर किंवा चेहरा झाकण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. याठिकाणी हिजाब परिधान केल्यास 13 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच चेहरा झाकण्याची सक्ती करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचीही तरतूद आहे.


अनेक देशांमध्ये दंड


बल्गेरियातही सरकारने चेहरा झाकण्याबाबत कायदा बनवला आहे. हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे येथे बेकायदेशीर आहे. येथील वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महिलांनी चेहरा झाकणे पूर्णपणे बंद केले आहे. त्याचबरोबर डेन्मार्कमध्ये चेहरा झाकण्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. येथे हिजाब घातल्यास किंवा चेहरा झाकल्यास 12 हजारांचा दंड भरावा लागतो. सीरियामध्ये 2010 पासून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय बेल्जियम आणि नेदरलँडमध्येही हिजाबवर बंदी आहे. नेदरलँडमध्ये शाळा, रुग्णालये आणि काही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


बेल्जियम आणि नेदरलँडमध्येही हिजाबवर बंदी
सीरियामध्ये 2010 पासून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय बेल्जियम आणि नेदरलँडमध्येही हिजाबवर बंदी आहे. नेदरलँडमध्ये शाळा, रुग्णालये आणि काही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.