WHO on Coronavirus : जगभरात कोरोना संसर्गाची तिसरी लाटेचा कहर सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. यात आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अॅडहानॉम गेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी असा दावा केला आहे की, कोरोना महामारी संपुष्टात (Impact Of Covid19) आल्यानंतरही अनेक वर्षांपर्यत याचे परिणाम दिसतील.
कोरोनाचा परिणाम अनेक दशके जाणवेल
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चेतावणी दिली आहे की, येत्या काळात कोरोना विषाणूचे आणखी नवीन प्रकार समोर येतील. तसेच कोरोना महामारीचा प्रभाव दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे लोकांवर त्याचा परिणाम अधिक घातक ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांचा विश्वास आहे की, कोरोना महामारीचे दुष्परिणाम अनेक दशकांपर्यंत जाणवू शकतात. त्यांनी सांगितले की, लसीकरणाबाबत जगातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे.
साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस पुढे म्हणाले की, सध्या जगातील देशांमधील लोकसंख्येपैकी केवळ 42 टक्के लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस मिळाला आहे. आफ्रिकन देशांमध्ये लसीकरणाचे सरासरी प्रमाण केवळ 23 टक्के आहे. ही विषमता भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे हे तातडीचे प्राधान्य आहे. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच जीव वाचवण्यासाठी आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी आम्ही मदत करत काम करत राहू यावरही त्यांनी भर दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : कोरोनाबाधितांमध्ये घट मात्र मृत्यूचे प्रमाण वाढते, देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 597 नवे रुग्ण
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक, अभ्यासात दावा
- पिझ्झा हट आणि केएफसीकडूनही काश्मीरबाबत ट्विट, नेटकरी संतापले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha