नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हतबल आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील असंख्य लोक आपल्या घरातच कैद आहेत. अशातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाशी लढणाऱ्या फ्रान्समध्ये हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच जगभरात आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
फ्रान्समध्ये 11 मेपर्यंत लॉकडाऊन फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'देशामध्ये 11 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, या लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरस व्यतिरिक्त दुसऱ्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतील. त्यांनी लिहिलं आहे की, 11 मेनंतर हळूहळू शाळा सुरू करण्यात येतील. जगभरात आतापर्यंत 1,19,413 लोकांचा मृत्यू जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1,19,413 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख पार पोहोचली आहे. जगभरात आतापर्यंत 19,20,258 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित असून जगभरातील सर्वाधिक मृतांची संख्याही अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. तर 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आहे. कोरोना व्हायरसमुळए सर्वाधिक प्रभावित 5 देश
देश एकूण कोरोना बाधित नवीन रूग्ण एकूण मृत्यू गेल्या 24 तासांत मृत्यू
अमेरिका 584,862 24,562  23,555 1,450
स्पेन 170,099 3,268 17,756 547
इटली 159,516 3,153 20,465 566
फ्रान्स 136,779 4,188 14,967 574
जर्मनी 129,207 1,353 3,118 96
गेल्या 24 तासांत कोणत्या देशांत काय परिस्थिती?
देश नवीन रूग्ण मृत्यू
अमेरिका 24,562 1,450
ब्रिटन 4,342 717
फ्रान्स 4,188 574
टर्की 4,093 98
स्पेन 3,268 547
याव्यतिरिक्त आतापर्यंत जगभरात लाखांहून अधिक लोक रिकव्हर झाले आहेत. दरम्यान, जगभरात 13, 57,059 कोरोना बाधित आहेत. जगभरात सर्वाधिक कोरोनाच्या तपासण्या अमेरिकेमध्ये केल्या गेल्या आहेत. येथे आतापर्यंत 29, 36,843 लोकांच्या तपासणी केली आहे. त्यानंतर जर्मनी, रूस आणि इटलीमध्ये सर्वाधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. संबंधित बातम्या :  Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू