मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील 24 तासात 96,104 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 24 तासात 5584 लोकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 39 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 13 लाख 40 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 28 लाख 65 हजार कोरोना रुग्ण आहेत.


Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO

जगात  कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,292,623 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय.  तर 76,928 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं  26,070 लोकांचा मृत्यू झालाय. 256,855 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,615 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 206,715 इतका आहे.

  • अमेरिका: कोरोनाबाधित - 1,292,623, मृत्यू- 76,928

  • स्पेन: कोरोनाबाधित - 256,855, मृत्यू- 26,070

  • इटली: कोरोनाबाधित - 215,858, मृत्यू- 30,615

  • यूके: कोरोनाबाधित - 206,715, मृत्यू- 30,615

  • रशिया: कोरोनाबाधित - 177,160, मृत्यू- 1,625

  • फ्रांस: कोरोनाबाधित - 174,791, मृत्यू- 25,987

  • जर्मनी: कोरोनाबाधित - 169,430, मृत्यू- 7,392

  • ब्राझिल: कोरोनाबाधित - 135,693, मृत्यू- 9,188

  • टर्की: कोरोनाबाधित - 133,721, मृत्यू- 3,641

  • इरान: कोरोनाबाधित - 103,135, मृत्यू- 6,486

  • चीन: कोरोनाबाधित - 82,885, मृत्यू- 4,633

  • भारत : कोरोनाबाधित - 56351, मृत्यू- 1889


10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 75 हजारांच्या वर गेला आहे.