मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 45 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या 303,345 गेली आहे. मागील 24 तासात 95,519  नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5,305 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात तीन लाख तीन हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32.53 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.


वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.


Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO


जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,456,745 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 86,900 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,614 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 233,151 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं  27,321 लोकांचा मृत्यू झालाय. 272,646 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 2,305 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 252,245 इतका आहे.


या दहा देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर




  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,456,745,        मृत्यू- 86,900

  • स्पेन: कोरोनाबाधित- 272,646,                  मृत्यू- 27,321

  • रशिया: कोरोनाबाधित- 252,245,                  मृत्यू- 2,305

  • यूके: कोरोनाबाधित- 233,151,                    मृत्यू- 33,614

  • इटली: कोरोनाबाधित- 223,096,              मृत्यू- 31,368

  • ब्राझील: कोरोनाबाधित- 202,918,            मृत्यू- 13,993

  • फ्रांस: कोरोनाबाधित- 178,870,                मृत्यू- 27,425

  • जर्मनी: कोरोनाबाधित- 174,975,              मृत्यू- 7,928

  • टर्की: कोरोनाबाधित- 144,749,                मृत्यू- 4,007

  • इरान: कोरोनाबाधित- 114,533,                मृत्यू- 6,854

  • चीन: कोरोनाबाधित- 82,929,                  मृत्यू- 4,633


10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित


जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 86 हजारांवर गेला आहे.


जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 81 हजार 900 रुग्ण, तर 2649 बळी कोरोनामुळं गेले आहेत.


अमेरिकेत अजूनही कहर सुरुच 


अमेरिकेने गेल्या 24 तासात 1703 लोक गमावले आहेत. एकूण बळींची संख्या 86 हजार 900 वर तर रुग्णांची संख्या 14 लाख 56 हजारांवर पोहोचली आहे.  न्यूयॉर्क प्रांतात काल 136 बळी गेले, तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 426 तर रुग्णांची संख्या 3 लाख 53 हजारांवर गेली आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 9946 , मासाचुसेट्स 5482, मिशिगन मध्ये 4787, पेनसिल्वानिया 4294,  इलिनॉईस 3928, कनेक्टिकट 3219, कॅलिफोर्निया 3041, लुझियाना 2417, फ्लोरिडा 1876, मेरीलँड 1866, जॉर्जिया 1544, टेक्सास 1258 आणि वॉशिंग्टनमध्ये 993 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.


स्पेनने गेल्या चोवीस तासात 217 लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 27 हजार 321 इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासात इटलीत कोविड-19 रोगाने 262 माणसांचा बळी घेतला.  काल रुग्णांची संख्या 992 ने वाढली,  इटलीत आता जवळपास 2 लाख 23 हजारावर रुग्ण आहेत. इंग्लंडने गेल्या 24 तासात 428 माणसं गमावली. तिथं एकूण बळींची संख्या 33 हजार 614 वर गेली आहे. तर फ्रान्सने काल दिवसभरात 351 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 27 हजार 425  बळी गेले आहेत.


रशियात २ लाख ५२ हजारावर रुग्ण झाले आहेत.  काल तिथं 93 बळी गेले. रशियात एकूण 2305 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 71 ची भर पडली. तिथं एकूण 6854 मृत्यू झालेत तर रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजारांवर पोहोचली आहे.


 कोरोनाने बेल्जियममध्ये काल 60 मृत्यूमुखी पडले तिथं एकूण बळींचा आकडा 8903 इतका आहे. हॉलंडमध्ये काल 28 बळी घेतले तिथे एकूण 5590 लोक दगावले आहेत.  ब्राझील 13993, कॅनडात 5472, टर्की 4007, स्वीडनमध्ये 3529, स्वित्झर्लंडने 1872, पोर्तुगाल 1184, इंडोनेशिया 1043, इस्रायल 265 तर सौदी अरेबियात 283 बळी कोरोनामुळं गेले आहेत. दक्षिण कोरियात  काल 29 रुग्णांची भर पडली, एकूण रुग्ण 10 हजार 991  कोरोनाबाधित तिथं आढळले आहे. काल एका मृत्यूची नोंद झाली तिथं. एकूण मृतांचा आकडा 260 झाला आहे. तर पाकिस्तानात रुग्णांची संख्या 35 हजार 770 च्या वर पोहोचली आहे, तिथे काल 9 बळी गेले, एकूण मृतांचा आकडा 770 वर पोहोचला आहे.