Coronavirus | जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे अख्खं जग हतबल झालं आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 81 लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 81 लाख 08 हजार 666 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 96 हजार 614 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे.


जगभरात कोणत्या देशात, काय परिस्थिती?


कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा जास्त कहर ब्राझीलमध्ये दिसून येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.


अमेरिका : एकूण रुग्ण 2,182,949, एकूण मृत्यू 118,283
ब्राझील : एकूण रुग्ण 891,556, एकूण मृत्यू 44,118
रूस : एकूण रुग्ण 537,210, एकूण मृत्यू 7,091
भारत : एकूण रुग्ण 343,026, एकूण मृत्यू 9,915
यूके : एकूण रुग्ण 296,857, एकूण मृत्यू 41,736
स्पेन : एकूण रुग्ण 291,189, एकूण मृत्यू 27,136
इटली : एकूण रुग्ण 237,290, एकूण मृत्यू 34,371
पेरू : एकूण रुग्ण 232,992, एकूण मृत्यू 6,860
इराण : एकूण रुग्ण 189,876, एकूण मृत्यू 8,950
जर्मनी : एकूण रुग्ण 188,044, एकूण मृत्यू 8,885


पाहा व्हिडीओ : गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक



8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण


ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरू या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.18 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन कोरोना बाधित टॉप-18 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


62 दिवसांनंतर कोरोनाबाधिताचा जीव वाचला, पण रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून पायाखालची जमीन सरकली!


'कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या सीमेवर कुरापती', तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप

'संकटाच्या काळात आशावादी राहा'; गूगल सीईओ सुंदर पिचई यांचा विद्यार्थांना कानमंत्र


न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा