Coronavirus World Update | संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाख 61 हजारांवर पोहोचली आहे. तसेच 46 लाख 20 हजारांहून अधिक लोक ठिक झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक आहे.

जगभरात कोणत्या शहरात, काय परिस्थिती?

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाख 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिर रुग्ण आणि मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 33158 रुग्ण आढळून आले आहेत, तर 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 55,209 रुग्ण आढळून आले असून 49,090 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.

अमेरिका एकूण रुग्ण : 2,296,809 एकूण मृत्यू : 121,402
ब्राझील एकूण रुग्ण : 1,038,568 एकूण मृत्यू : 49,090
रशिया एकूण रुग्ण : 569,063 एकूण मृत्यू : 7,841
भारत एकूण रुग्ण : 395,812 एकूण मृत्यू : 12,970
यूके एकूण रुग्ण : 301,815 एकूण मृत्यू : 42,461
स्पेन एकूण रुग्ण : 292,655 एकूण मृत्यू : 28,315
पेरू एकूण रुग्ण : 247,925 एकूण मृत्यू : 7,660
इटली एकूण रुग्ण : 238,011 एकूण मृत्यू : 34,561
इराण एकूण रुग्ण : 200,262 एकूण मृत्यू : 9,392
जर्मनी एकूण रुग्ण : 190,660 एकूण मृत्यू : 8,960

8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.21 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा समावेश कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते : डब्ल्यूएचओ

कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं