Coronavirus World Update | जगभरात कोरोना व्हायरसने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. दरदिवशी नवे कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने जवळपास चार लाख 55 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्म फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक झाली आहे.

जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

अमेरिका  एकूण रुग्ण : 2,263,651 एकूण मृत्यू : 120,688
ब्राझील एकूण रुग्ण : 983,359 एकूण मृत्यू : 47,869
रशिया एकूण रुग्ण : 561,091 एकूण मृत्यू : 7,660
भारत एकूण रुग्ण : 381,091 एकूण मृत्यू : 12,604
यूके एकूण रुग्ण : 300,469 एकूण मृत्यू : 42,288
स्पेन एकूण रुग्ण : 292,348 एकूण मृत्यू : 27,136
पेरू एकूण रुग्ण : 244,388 एकूण मृत्यू : 7,461
इटली एकूण रुग्ण : 238,159 एकूण मृत्यू : 34,514
इराण एकूण रुग्ण : 197,647 एकूण मृत्यू : 9,272
जर्मनी एकूण रुग्ण : 190,126 एकूण मृत्यू : 8,946
8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित ब्राझील, रशिया, स्पेन, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे केस आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, तर भारताचा समावेश कोरोना बाधित टॉप-4 देशांमध्ये झाला आहे. महत्त्वाच्या बातम्या :  वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते : डब्ल्यूएचओ कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं