Coronavirus vaccine : जगभरात अनेक कोरोना वॅक्सिनची ट्रायल सुरु आहे. परंतु, जवळपास सर्वच वॅक्सिनची ट्रायल प्रौढ व्यक्तींवर करण्यात आली होती. दरम्यान, लहान मुलांसाठीही कोरोनावरील प्रभावी लसीची गरज आहे. त्यामुळे लहान मुलांवरही अनेक लसींचं परिक्षण केलं जात आहे. अशातच सध्या अनेक देशांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच अनेक लहान मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. औषध निर्माता कंपनी फायझरने मुलांना लहान मुलांसाठी मोठी घोषणा केली आहे. फायझरने बुधवारी सांगितलं की, त्यांची वॅक्सिन 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. 


आता जगभरात ज्या वॅक्सिन आलेल्या आहेत, त्या केवळ प्रौढांसाठीच आहेत. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांपेक्षा प्रौढांना अधिक आहे. फायझरच्या लसीला 16 वर्ष आणि त्या पुढील वयोगटाच्या मुलांपर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. अशातच अनेक महिन्यांच्या अडथळ्यानंतर शाळा पूर्णपणे उघडण्यास आणि कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी सर्वच वयोगटातील मुलांचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. 


फायझरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 12 वर्ष वयोगटापासून 15 वर्षांपर्यंतच्या स्वयंसेवकांवर करण्यात आलेल्या परिक्षणाच्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये ज्या स्वयंसेवकांना कोरोनाची लस देण्यात आली होती, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नसल्याचं निष्पन्न झालं. 


दरम्यान, हे संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. परंतु, या संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणजे, लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता लसीकरणानंतर वाढताना दिसत आहे. कंपनीने सांगितलं की, लहान मुलांमध्येही प्रौढांप्रमाणेच लसीकरणाचे साईड इफेक्ट्स आहेत. जसे, अंगदुखी, ताप येणं विशेषतः लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ही लक्षणं दिसून येतात. संशोधनात सहाभागी झालेल्या स्वयंसेवकांवर दोन वर्षांपर्यंत नजर ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन लसीच्या परिणामांची अधिक तपासणी करता येईल. 


फायझर आणि त्यांचे जर्मनीतील पार्टनर बायोएनटेक पुढच्या काही आठवड्यांमध्ये यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन आणि युरोपीय  रेगुलेटर्स यांच्याकडे 12 वर्ष वयोगटापासून पुढच्या मुलांचं लसीकरण करण्यासाठी आपातकालीन मंजुरीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :