रोम : जगभरात कोरोनानं थैमान घातल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. मात्र, यामुळे अजूनही अनेक भारतीय परदेशात अडकून पडले आहेत. इटलीमध्ये अडलेल्या एका मालवाहू जहाजावर 224 भारतीय अडकून पडले आहेत. या जहाजावर असलेल्या अन्य देशांच्या कामगारांना त्यांच्या देशांनी परत नेलं आहे. मात्र, सध्या 224 भारतीय कामगार लॉकडाऊनमुळे जहाजावर अडकून पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जहाजावरील 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून 34 जण संशयित आहेत.
खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाच्या टेस्ट मोफत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
जहाजावर कोरोना अतिशय वेगाने पसरण्याची भीती असून त्यामुळे भारत सरकारने आम्हाला लवकरात लवकर इथून मायदेशी न्यावं, असं आवाहन जहाजावर अडकलेल्या प्रवीण जोशीलकर या महाराष्ट्रातल्या तरुणाने केलंय. प्रवीण हा माथेरानचा राहणारा असून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या सुटकेसाठी आवाहन केलं आहे. त्यामुळे आता राज्यासह केंद्रीय पातळीवर या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरस आता जगभर पसरला आहे. चीनमध्ये या आजावर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलं आहे. मात्र, आता याने जगभरा थैमान घालायला सुरुवात केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटलीसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातही या देशाने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. सध्याच्या घडीला देशात कोरोना संक्रमितांचा आकडा पाच हजारच्यावर गेला आहे.
coronavirus | पुण्यात चोवीस तासात कोरोनाबाधित 10 रूग्णांचा मृत्यू
अनेक भारतीय मायदेशात
ज्यावेळी कोरोनाचा कहर चीनसह अन्य देशात सुरु झाला. त्यावेळी अनेक भारतीय मायदेशी परतू लागले. अनेक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मायदेशात परत आणले. मात्र, त्यानंतर देशात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली. परिणामी अनेक भारतीय अद्याप परदेशात अडकले आहे. त्यानंतर आता देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. यापैकीच इटलीमध्ये अडलेल्या एका मालवाहू जहाजावर 224 भारतीय अडकून पडले आहेत. या जहाजावर असलेल्या अन्य देशांच्या कामगारांना त्यांच्या देशांनी परत नेलं आहे. मात्र, सध्या 224 भारतीय कामगार लॉकडाऊनमुळे जहाजावर अडकून पडले आहेत.
Rajesh Tope | महाराष्ट्र अजूनही तिसऱ्या टप्प्यात नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा : राजेश टोपे