नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात 2.34 लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1341 लोकांचा जीव गेला आहे. गेल्या 24 तासात 1.23 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी गुरूवारी देशात 2.17 लाख कोरोनाच्या रुग्णांची भर पडली होती. शुक्रवारची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता तो एक विक्रमच ठरला आहे. 


गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला कोरोनामुळे 1290 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी 1341 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. 


देशातील आजची कोरोनाची स्थिती



  • एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 45 लाख 26 हजार 609

  • कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 26 लाख 71 हजार 220

  • सध्याचे सक्रिय रुग्ण : 16 लाख 79 हजार 740

  • एकूण मृत्यू : 1 लाख 75 हजार 649

  • एकूण लसीकरण : 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 


शुक्रवारी एकाच दिवशी देशात एकूण 30 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून देशात 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.


भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. 


महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
महाराष्ट्रात शुक्रवारी सर्वाधिक  63,729 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 एवढे झाले आहे. 


राज्यात शुक्रवारी 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मत्युंची नोंद झाली असून राज्यातील मत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,38,034 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


महत्वाच्या बातम्या :