Coronavirus : कोरोना अर्थात SARS-CoV-2 व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचं प्रबळ पुराव्यातून सिद्ध झालं असल्याचं संशोधन द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात सांगण्यात आलंय की कोरोना हवेतून परसतोय आणि त्याचे सातत्याने पुरावे संशोधकांना मिळत आहेत.
ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितलंय की कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणं शक्य झाले नाही. कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत.
या अहवालात असंही सांगण्यात आलंय की, बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील वा बंदिस्त वातावरणात कोरोनाचा प्रसार जास्त होतोय. पण घरी योग्य ती वेन्टिलेशन व्यवस्था असेल तर कमी धोका आहे. तसेच लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपैकी 40 टक्के असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.
या आधीही काही वैज्ञानिकांनी दावा केला आहे की कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतोय. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते.
गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात, 32 देशांच्या 200 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहलं होतं. त्यामध्ये सांगितलं होतं की, कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय. डोळ्याला न दिसणाऱ्या कणांमुळे लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होतोय.
द लॅन्सेन्ट या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द झालेल्या या अभ्यासावर आता जागतिक आरोग्य संघटनेने आणि जगभरातल्या देशांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांनी विचार करावा आणि हवेच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येईल त्यावर उपाययोजना कराव्यात असं मत काही संशोधकांनी व्यक्त केलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Super-Spreaders | होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर
- Maharashtra Coronavirus : कोरोनाचा कहर थांबेना! आज सर्वाधिक 63,729 रुग्णांचे निदान, 45,335 जणांना डिस्चार्ज
- Nirav Modi Extradition Approved : नीरव मोदींना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची प्रत्यार्पणास मान्यता