बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसमुळे मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं संक्रमण झाल्यामुळे चीनमध्ये 1016 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40,000 अधिक लोकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचं समोर आलं आहे. नेशनल हेल्थ कमीशनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे आणखी 97 लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील 91 लोक हुबेई येथील होते.


नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, हीलोंगजियांग, जिआंगशी, हैनान आणि गान्सूमधून या ठिकाणांहून एका-एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चीनमधील 31 राज्यांमध्ये आतापर्यंत एकून 908 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 296 रूग्ण कोरोना व्हायरसमुळे आजारी होते. तसेच एकूण 3281 लोकांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं आहे. चीनी आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस सेवेरे एक्ट्यू रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स)चं दुसरं रूप आहे. दरम्यान, 2002-2003मध्ये हॉन्गकॉन्ग आणि चीनमध्ये या आजारामुळे 650 लोकांचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील 120 लोकांचा मृत्यू झाला होता.


चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचं त्यांना आढळून आलं. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत हजाराहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


पाहा व्हिडीओ : EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरसचं सध्याचं अपडेट काय? | बातमीच्या पलीकडे | ABP Majha



कोरोना व्हायरसवर औषध सापडल्याचा दावा


थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झाला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलं आहे.


कोरोना व्हायरस म्हणजे काय?


कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.


लक्षणे कोणती आहेत ?


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.


काय काळजी घ्याल?


तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.


संबंधित बातम्या : 


जपानमध्ये क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले, क्रूजमधील 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग


कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू


Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा


Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित


केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांकडून राज्य आपत्तीची घोषणा