Corona News : कोरोना विषाणूचा (corona virus) प्रसार नेमका कसा झाला याबाबत वैज्ञानिक (scientist) प्रयोगशाळेत संशोधन करत आहे. या संशोधनातून विविध निष्कर्ष समोर येत आहेत. चीनच्या वुहान शहरातील हुआनान सीफूड मार्केट (Huanan Seafood Market) कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू असल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे. हुआनान सीफूड मार्केटमध्ये 2019 च्या शेवटी विक्री केलेल्या जिवंत प्राण्यांपासून कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आलं आहे. सीफूड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाची विक्री केली जाते, यातूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचे अभ्यासात म्हटलं आहे.


2019 च्या उत्तरार्धात बाजारात विकल्या गेलेल्या प्राण्यांच्या मांसामध्ये कोरोना विषाणू अस्तित्वात असावा अशी शक्यता या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोणते प्राणी आजारी पडले असावेत, हे या अभ्यासातून निश्चित झाले नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला कोरोनाची लागण ही जिवंत प्राण्यांची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना झाली होती. 20 डिसेंबरपूर्वी आढळून आलेली कोरोनाची प्रकरणे ही बाजारपेठेच्या पश्चिमेकडील भागात आढळी होती. त्या ठिकाणी सस्तन प्राण्यांच्या खरेदी विक्री झाली होती असे अभ्यास सांगण्यात आलं आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाची लागण झालेले लोक हुआनान सीफूड मार्केटच्या अगदी जवळ राहणारे किंवा त्या ठिकाणी काम करणारे लोक होते.


सुरुवातीच्या काळात हुआनान सीफूड मार्केटमध्ये काम करणार्‍या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला. त्यानंतर तो इतर ठिकाणी पसरल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे. या ठिकाणी काम करणारे लोक आजूबाजूच्या स्थानिक समुदायात गेल्यानं त्यातून संपर्क आल्यानं संसर्ग वाढत गेल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे.
सुरुवातील प्राण्यापासून मानवापर्यंत कोरोनाचे संक्रमण झाले.  साधारणत: 18 नोव्हेंबर 2019 च्या सुमारास अशा प्रकारची लागण झाली होती. त्याचाथेट संबंध हा हुआनान सीफूड मार्केटमधील लोकांशी आढळला होता.


2019 च्या शेवटी हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरल्याचे अभ्यासात सांगण्यात आलं आहे. डिसेंबर 2019 मध्ये नोंदवले गेलेले आणि त्यावर उपचार करण्यात आलेली प्रारंभिक प्रकरणे वुहान मार्केटशी संबंधीत आहेत. म्हणजे हे लोक तिथे गेले होते किंवा तिथे काम करत होते त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी सकारात्मक चाचणी घेतलेले बहुतेक लोक मासळी बाजारात जिवंत प्राण्यांची विक्री करणारे किंवा त्यांच्याशी संबंधित लोक असल्याचं सांगण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: