Corona Cases in China: जगभरात कोरोनाचा प्रसार ज्या चीनमधून झाला त्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. चीनच्या शिआन (Xi'an) प्रांतामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 1.30 कोटी लोकांना घराबाहेर न पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रांतात प्रवासावर काटेकोर नियंत्रण आणण्यात आलं आहे. त्यामुळे चीन तसेच जगभराच्या चिंतेत वाढ झाली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे (Winter Olympics) आयोजन करण्यात येणार आहे. पण आता पुन्हा एकदा चीनच्या प्रमुख शहरांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने चीनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या शिआन प्रांतात बुधवारी 52 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत या प्रातांत एकूण रुग्णसंख्या 143 वर पोहोचली आहे.
या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीन सरकारने हाय अलर्ट जारी केला असून शिआन प्रांतामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला आहे. या प्रांतातील प्रत्येक कुटुंबातील एकाच सदस्याला केवळ अत्यावश्यक सामानांची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली असून गुरुवारपासून हा आदेश लागू करण्यात येणार आहे. या भागातील सर्व शाळा बंद करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं अन्यथा नियमांचे पालन करुन घरीच रहावं असा आदेश चीनच्या सरकारने दिला आहे. जर एखाद्याला शहर सोडायचं असेल तर त्याचं कारण आणि परिस्थितीचा पुरावा द्यावा लागेल. शिआन प्रांतातील 1.30 कोटी नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :