City of Twins : अनेकदा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणीत किंवा नातेवाईकांमध्ये जुळी मुलं (Twin Babies) पाहिली असतील. ही जुळी मुळं चेहरा, नाकी, डोळी अगदी हुबेहुब दिसतात. मात्र, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की असं एक शहर आहे जिथे प्रत्येक कुटुंबात जुळी मुलं राहतात. तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण, देशात असं एक शहर आहे. त्या ठिकाणी जुळी मुलं जन्मतात. या शहर नायजेरियात (Nigeria) आहे. 


हे शहर कोणतं? 


आज आम्ही तुम्हाला अशा शहराबद्दल सांगणार आहोत जिथे सगळीकडे फक्त जुळी मुले दिसतात. हे शहर नायजेरियामध्ये आहे आणि त्याचं नाव इग्बो-ओरा (Igbo-Ora) आहे. येथील लोकसंख्या 2 लाख 78 हजार आहे. पण इथे जुळ्या मुलांचा जन्मदर इतका जास्त आहे की त्याला जगातील जुळ्या मुलांची राजधानी म्हटलं जातं. इथे प्रत्येक 1000 जन्मांमध्ये 158 जन्म जुळ्या मुलांचे होतात. जर जुळ्या जन्मदराची तुलना युरोप आणि अमेरिकेशी केली तर ती खूप जास्त आहे. प्रत्येक 1000 जन्मांमागे युरोपमध्ये 16 जुळ्या आणि अमेरिकेत 33 जुळ्यांचे जन्म होतात.


इग्बो-ओरा शहर लागोसपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. येथे राहणारे बहुतांश लोक शेतकरी आणि छोटे व्यापारी आहेत. 


जुळी मुलं जन्माला येण्यामागचं कारण काय?  


लागोस युनिव्हर्सिटीतील एका अभ्यासानुसार इथे महिलांच्या आहारात yams cassava आणि yam tubersचं प्रमाण जास्त आहेत. यामुळे शरीरात एक विशिष्ट प्रकारचं केमिकल किंवा हॉर्मोन विकसित होतं आणि ते गर्भधारणेदरम्यान गर्भाशयात दोन अंड्यांचे फलन करण्यास कारणीभूत ठरतं आणि जुळी मुलं जन्मतात, असं गायनॅकॉलॉजिस्टचं म्हणणं आहे. तिथले लोक मात्र okra leaf or Ilasa soup ला कारणीभूत मानतात. पण, खाण्यायोग्य फळांचा किंवा सूपचा जुळ्या मुलांच्या जन्माशी संबंध असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही.


जुळी मुलं का जन्मतात?


एकाच गर्भावस्थेत जन्मलेल्या दोन मुलांना जुळी मुलं म्हणतात. जुळी दोन मुलं किंवा दोन मुली, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी अशी कोणतीही जोडी असू शकते. याचा अर्थ एकाच गर्भातून जन्मलेली मुले जी वैज्ञानिक भाषेत एकयुग्मनज असतात, म्हणजेच ती एकाच युग्मजापासून विकसित होतात जी विभाजित होऊन दोन गर्भाचं रूप धारण करतात. त्यापैकी बहुतेक जुळी दिसायला सारखी असतात. कधीकधी जुळी मुलं शारीरिक रंग-रुपाने वेगवेगळी असतात. 


महत्त्वाच्या बातम्या : 


General Knowledge : गाड्यांच्या टायरचा रंग फक्त काळाच का? लाल,पिवळा,निळा का नाही? वाचा यामागचं खरं कारण