Miss Universe 2023 : संपूर्ण जगाच्या नजरा 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) स्पर्धेकडे लागल्या आहेत. भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. भारतीयांना दिविताकडून खूप अपेक्षा आहेत. 14 जानेवारी रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी पडणार आहे. या स्पर्धेत 86 देशाच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला आहे. अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहरामध्ये 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) पार पडत आहे. मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत भारताची कमान कर्नाटकची मॉडेल दिविता रायच्या हाती आहे.


मिस युनिव्हर्स स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भारताच्या सुष्मिता सेन (Sushmita Sen), लारा दत्ता (Lara Dutta) आणि हरनाज संधू (Harnaaz Sandhu) यांनी हा मुकुट जिंकण्याचा मान मिळवला आहे. या तिन्ही सौंदर्यवतींनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 


Who is Divita Rai : कोण आहे दिविता राय?


दिविता रायचा जन्म 10 जानेवारी 1998 रोजी कर्नाटकातील मंगळूर येथे झाला. दिविता राय सध्या 25 वर्षांची आहे. तिने कर्नाटकातील राजाजीनगर येथील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ती मुंबईला आली. दिविताने मुंबईच्या सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केले आहे. दिविता व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते. तिला चित्रकला आणि संगीताचीही विशेष आवड आहे. दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात. वडिलांमुळे ती देशातील अनेक शहरांमध्ये राहिली आहे. 






Miss Diva Universe 2022 : 'मिस दिवा युनिव्हर्स 2022' दिविता राय


दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे. 2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती. 


मिस युनिव्हर्स स्पर्धा भारतात कधी पाहता येणार?


मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Miss Universe 2023 : भारताची कमान दिविता रायच्या हाती, मिस युनिव्हर्स स्पर्धेत 'सोनपरी' अंदाज चर्चेत