China-Taiwan Dispute : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यातच आता तैवानवरून अमेरिका आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. "तैवानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले तर युद्ध पुकारण्यास विलंब लागणार नाही, अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे. "आम्ही युद्ध सुरू करण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही, मग त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालतील, असे चीनने म्हटले आहे.
"चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे म्हणाले, 'कोणीही त्यांच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी चिनी सशस्त्र दलांचा संकल्प आणि क्षमतांना कमी लेखू नये. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी कालच चीनच्या वाढत्या विस्तारवादावरून चीनला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज फेंगे यांनी थेट चीनला धमकी दिली आहे.
"चीनमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात तैवानच्या स्वातंत्र्याचा विचार करणाऱ्यांचा अंत नक्कीच चांगला होणार नाही, असे चिनी मंत्री म्हणाले. "आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत लढू. आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी चिनी सशस्त्र दलांचा संकल्प आणि क्षमता कोणीही कमी लेखू नये. कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही शेवटपर्यंत तैवानसाठी लढू, असे फेंगे यांनी म्हटले आहे.
शनिवारी सिंगापूरमधील प्रीमियर डिफेन्स फोरममध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले होते की, "इंडो-पॅसिफिक देशांना सागरी लष्कराकडून राजकीय धमकी, आर्थिक बळजबरी किंवा छळाचा सामना करावा लागू नये." चीनच्या वाढत्या विस्तारवादाला तोंड देत तैवानला पाठिंबा देण्याची भूमिका ऑस्टिन यांनी बोलून दाखवली होती. ऑस्टिन यांच्या या भूमिकेवरून चीनकडून अमेरिकेला थेड युद्धाची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या