Alimihan Seyiti Dies at 135: शिनजियांग उईघुर स्वायत्त प्रदेशातील चीनमधील सर्वात वृद्ध महिला अलीमिहान सेयती यांचं गुरुवारी निधन झालंय. वयाच्या 135 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्या चीनमधील सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या. त्याच्या मृत्युला स्थानिक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय. 'चायना असोसिएशन ऑफ जेरोन्टोलॉजी अँड जेरियाट्रिक्स'ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये त्या देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या यादीत पहिल्या स्थानावर होत्या.
अलीमिहान सेयती यांचा जन्म 25 जून 1886 रोजी झाला होता. त्या काशगर प्रांतातील शुले परगण्यातील कॉम्क्सरिक टाउनशिपमधील रहिवासी होत्या. दरम्यान. त्यांचा 16 डिसेंबर 2021 रोजी निधन झालंय. वेळेवर जेवण करणे आणि घरातील अंगणात सूर्यस्नानाचा आनंद घेणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. मरेपर्यंत त्या कुणाच्याही मदतीशिवाय मैत्रिणींसोबत हिंडत होत्या. इतकी वर्षे जिवंत राहण्यामागे त्यांची संस्कृती आणि वातावरण असल्याचं अलीमिहान सेयती यांचं म्हणणं होतं.
दरम्यान, आरोग्य सेवेतील सुधारणेमुळं त्यांच्या दीर्घायुष्यात अंशतः हातभार लागलाय. स्थानिक सरकारनं कंत्राटी डॉक्टर सेवा, मोफत वार्षिक शारीरिक तपासणी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी मासिक प्रगत-वय अनुदान दिलंय. चायना असोसिएशन ऑफ जेरोन्टोलॉजी अँड जेरियाट्रिक्सच्या 2013 मध्ये देशातील सर्वात वृद्ध जिवंत लोकांच्या यादीत त्यांनी अव्वल स्थान पटकावलं होतं.
चीनमधील कोमक्सरिक शहराला "दीर्घायुष्याचे शहर" म्हणून ओळखलं जातं. यामागचं कारणही तसेच आहे. या शहरात 90 वर्षांवरील अनेक वृद्ध राहतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha