Crime News : चीनमधून (China) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमधील दफनभूमी तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांमधून 4 हजाराहून अधिक मृतदेह चोरुन (dead bodies stolen) त्यातील हाडे विकण्यात (bones sold) आली आहेत. दंत रोपणासाठी ही हाडे विकण्यात आली आहेत. चीनमधील यंत्रणांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 


 18 टन मानवी हाडे जप्त


मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील काही टोळ्या मडतदेह चोरत असल्याचे समोर आले आहे. मृतदेह चोरुन हाडांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शांक्सी प्रांतातील तैअुयान येथील पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. यातून या टोळ्या मोठा पैसा कमवत असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी तब्बल 18 टन मानवी हाडे व त्यापासून बनवलेली 35 हजार उत्पादने नुकतीच जप्त केली आहेत. 


पोलिसांसह कर्मचारी देखील यामध्ये सामील असल्याचा आरोप


हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांच्या संमत्तीने त्यांची हाडे प्रत्यारोपणासाठी घेतली जातात. चीनमधील दफनभूमितून अनेक मृतदेह चोरल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. त्यातील काही प्रकरणांचा छडा लागला आहे. मृतदेहातील हाडांचा व्यापार करुन त्याद्वारे अनेक लोक सधन झाले आहेत. ही सर्व गैरकृत्य करणाऱ्या संघटीत टोळ्यांशी पोलिसांचेही संगमनमत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच दफनभूमीतील कर्मचारी देखील यामध्ये सामील असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता; कसा लागला गुन्ह्याचा छडा?