Bangladesh Hindu Violence : बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून त्याने संताप व्यक्त केला. हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे रक्त उसळतंय, संयुक्त राष्ट्राने यावर धारण केलेलं मौन शरमेची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देश सोडला. पण बांगलादेशमधील हिंसाचार मात्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. त्यातही आता बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झालीय. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बांगलादेशात अनेक हिंदू गावे जाळल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. महिलांवरील बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. असाच एक व्हिडिओ Voice_For_India नावाच्या यूजरने शेअर केला आहे. त्यात एका हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली असे लिहिले होते.
पाकिस्तानी क्रिकेटरची संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने या व्हिडीओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूंवर होत असलेले अत्याचार पाहून आपले रक्त उकळत असल्याचे तो म्हणाला. संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे या हिंसाचारावर असलेलं मौन शरमेची बाब आहे असं तो म्हणाला.
'आम्ही देश सोडणार नाही, हा आमचा देश आहे'
बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनेच्या निषेधार्थ ढाका येथे हिंदूंनी निदर्शने केली. बांगलादेश हिंदू जागरण मंचने राजधानी ढाक्यातील शाहबागमध्ये हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवला. निदर्शकांनी सांगितलं की, दिनाजपूरमध्ये 4 हिंदू गावे जाळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक हिंदू निराधार झाले आहेत. बळजबरीने त्यांना सीमावर्ती भागात आश्रय घ्यावा लागतो. रॅ
आम्ही या देशात जन्मलो, काही झालं तरी देश सोडणार नाही अशी प्रतिक्रिया या निदर्शकांनी दिली. हा देश आपल्या पूर्वजांचे जन्मस्थान असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदू संघटनेने निदर्शनादरम्यान काही मागण्याही मांडल्या. यामध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना, संरक्षण आयोगाची स्थापना, हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे आणि अल्पसंख्याकांसाठी 10 टक्के संसदीय जागा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: