चीनमध्ये आता 'हम दो, हमारे तीन' धोरण, का बदलला आधीचा निर्णय...
China child policy: चीन सरकारनं आता चिनी दाम्पत्यांना तीन अपत्यांची परवानगी दिली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली.

चीन : चीन सरकारनं आता चिनी दाम्पत्यांना तीन अपत्यांची परवानगी दिली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली. त्यात आधी दोन अपत्यच जन्माला घालावीत हे धोरण आता शिथिल करण्यात आलंय.
चीन मध्ये नुकतचं 'हम दो हमारे तीन'ला परवानगी मिळाली आहे. जन्मदराच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे चीनला हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलावं लागलं आहे. आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय घेतला आहे. याला नॅशनल पीपल्स काँग्रेसने देखील मान्यता दिलीय.
1979 साली दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तत्कालीन सरकारने हम दो हमारा एकची सक्ती चीन मध्ये लागू केली. ही सक्ती पुढे 2015 साला पर्यत कायम होती. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येईल असा विश्वास चीन सरकारला होता. तसं झालं देखील मात्र त्याचे दुष्परिणाम देखील आता दिसायला सुरुवात झाली आहे. तिथे जन्मदराच्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता भविष्यात चीनचे लोकसंख्या संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
चीन मधील संभाव्य धोका लक्षात मे महिन्यात लोकसंख्या नियंत्रणाबाबत लागू असलेल्या आपल्या कडक धोरणात शिथिलता आणत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला आणि त्याला शुक्रवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने मंजुरी देखील दिलीय. याशिवाय 3 अपत्यांना जन्माला घालणाऱ्या कुटूंबांसाठी आणि पाल्यांसाठी भरघोस योजना देखील जाहीर केल्या आहेत.
सरकारकडून सूट कशात मिळणार
मुलांचे संगोपन आणि शिक्षणात सूट
विविध करांमध्ये सूट मिळणार
मुलांना विमा योजनेचा लाभ मिळणार
निवासस्थान आणि रोजगारात भरघोस सवलती
तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनामुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या जरी 4 हजार 600 कोरोनामुळे मृत्यू पावलेलांचा आकडा सांगितला असला तरी प्रत्येक्षात मात्र याची संख्या मोठी आहे. दुसरीकडे मागच्या काही वर्षात लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे वृद्ध नागरिकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताला नामोहरम करणं असेल किंवा जागतिक महासत्ता व्हायचं असेल तर त्यासाठी तरुणांचं बळ देशाकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आशा प्रकारचं धोरण अवलंबिण्यात आल्याची सध्या माध्यमांमध्ये चर्चा आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















