चीनने 2022-23 या वर्षासाठी आपल्या संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ केली आहे. त्याचा संरक्षण खर्च 7.1% ने वाढून 229 बिलियन डॉलर्स इतका झाला आहे. यापूर्वी चीनचे संरक्षण बजेट 6.8 टक्के होते. शनिवारी आपला अर्थसंकल्पीय खर्च जाहीर करताना त्यांनी आपल्या सैन्याच्या ताकदीचा जगभराला संदेश दिला आहे. अमेरिकेनंतर चीन आता जगातील सर्वात जास्त संरक्षण बजेट खर्च करणारा देश बनला आहे.


संरक्षणावरील खर्चाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर


चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 2022 या वर्षासाठी 768.2 अब्ज संरक्षण बजेटला मंजुरी दिली आहे. यामध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोहीम राबवण्यासाठी 7.1 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्पात हायपरसोनिक शस्त्रे, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, 5G, क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासारख्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला होता.


संरक्षण बजेटवरील खर्चाच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक लागतो


रशियाच्या जागतिक शस्त्रास्त्र व्यापारावर नजर ठेवणाऱ्या स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, 2020 मध्ये रशियाचे संरक्षण बजेट 61.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते. जे चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरे सर्वात मोठे संरक्षण बजेट होते.


भारताने 2021-22 च्या तुलनेत यावर्षी संरक्षण बजेटमध्ये सुमारे 10 टक्के वाढ केली आहे. या वर्षासाठी म्हणजे 2022-23 साठी एकूण संरक्षण बजेट सुमारे 5.25 लाख कोटी केले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 मध्ये एकूण संरक्षण बजेट 4.78 लाख कोटी इतके होते. तसेच भारताने संरक्षण संशोधन आणि विकास (R&D) मध्ये खाजगी उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने, पहिल्यांदाच संरक्षण बजेटमधील आरअँडडी पैकी 25 टक्के स्टार्ट-अप, स्वदेशी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना निधी वाटप करण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: