एक्स्प्लोर

सीरियात रासायनिक हल्ला, लहान मुलांसह 100 जणांचा मृत्यू

दमिश्क : सीरियाच्या इदलिब प्रांतात मंगळवारी रासायनिक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या लहान मुलांची असल्याचं समजतं आहे. तर या हल्ल्यामुळे 400 हून आधिकजणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. सीरियाच्या ऑब्जरवेटरी फॉर ह्यूमन राईटसि (SOHR) ने दिलेल्या माहितीनुसार, इदलिब प्रांतातातील खान शयखुन भागात हा हल्ला झाला. इदलिब मीडिया सेंटरचा छायाचित्रकार हुसैनने AP या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान स्फोटांचे मोठे आवाज झाले. यानंतर तो घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला अनेकजण जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. तसेच काहीजणांना चालायलाही त्रास होत होता. तर इदलिबमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या रुग्णवाहिकेचा सेवेचा प्रमुख मोहम्मद रसुलने बीबीसीला सांगितलं की, त्याच्या डॉक्टरांनी स्वत: च्या डोळ्यादेखत अनेकजणांना प्राण सोडताना पाहिलं. या हल्ल्याची माहिती मंगळवारी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून देण्यात आली होती. या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्बचा सीरियावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स आदी देशांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बसर-अल-असद यांना जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे बंडखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचं सीरियाच्या सैन्य दलाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, सीरियाच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ब्रसेल्समध्ये दोन दिवसांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाला आहे. या संमेलनामध्ये युरोपीय संघांसोबतच संयुक्त राष्ट्र संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं विमान सीरियाची होती की, सरकारला सहकार्य करणाऱ्या रशियाची होती, हे अजून समजू शकलेलं नाही. पण या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Embed widget