Chinese Scientist Claims about Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ने चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर (Lunar South Pole) उतरून नवा इतिहास रचला. मात्र, इस्रोच्या चंद्र मोहिमेवर (ISRO Lunar Mission) चीनने प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं नाही, असा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. चिनी शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, भारताची चंद्रमोहिम चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलीच नाही. इस्रोच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडीग केलं. त्यानंतर जगभरातून भारताच्या यशाचं कौतुक होतं आहे. असं असताना चीनच्या मात्र, पोटात दुखत आहे. 


भारताचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर पोहोचलंच नाही


चीन भारताला मागे पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भारतावर कुरघोडी करण्यासाठी चीनची मजल अवकाशात पोहोचली आहे. भारताची चांद्रयान-3 मोहिम अयशस्वी झाल्याचा दावा करत आहे. भारताचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर पोहोचलंच नाही, असं चिनी शास्त्रज्ञ सांगत आहेत. इतकंच नाही तर, चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमेसाठीही सज्ज झाला आहे.


भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर


इस्रोच्या चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:03 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट-लँडींग करणारा पहिला देश बनला आहे. विक्रम लँडरसह प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर काही यशस्वी चाचण्याही पूर्ण केल्या आहेत. चीनचे युटू-2 रोव्हर हे चंद्रावर सध्या कार्यरत आहे.


चिनी शास्त्रज्ञांचा दावा काय?


चीनच्या चंद्रासंबंधित संशोधन कार्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे चिनी शास्त्रज्ञ ओयांग झियुआन यांनी दावा केला आहे की, चंद्रावर उतरण्याची इस्रोची यशस्वी कामगिरी वाढवून सांगितलेली आहे. 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रवास सुरू केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं.


शास्त्रज्ञाने चिनी भाषेतील वृत्तपत्र सायन्स टाईम्सला सांगितले की, चांद्रयान-3 ची लँडिंग साइट 69 अंश दक्षिण अक्षांशावर असून ते दक्षिण ध्रुवाजवळ नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव 88.5 आणि 90 अंशांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातो, असंही त्यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Chandrayaan-3 : भारताची चांद्रयान मोहिम चीनच्या जिव्हारी, 'ड्रॅगन' चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पाठवणार रोबोट